ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:57 PM2017-10-26T16:57:54+5:302017-10-26T16:59:44+5:30

ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली

Eight dams in the state are selected to bring down the cane crop | ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

Next
ठळक मुद्देनाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रसध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ : ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली असून, प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० दोन टक्के दराने शेतकºयांना कर्जरुपाने दिले जाणार आहेत. 
राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात वरचेवर ऊस पिकाचे क्षेत्र वाढत आहे. उसासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ठिबकचा वापर केला तर किमान ४० टक्के पाण्याची बचत होईल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. राज्यातील एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी सुमारे ७० टक्के पाणी हे सिंचनासाठी वापरले जात असल्याचा शासनाचा दावा आहे. एक-दोन वर्षांनंतर राज्याच्या विविध भागात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते.   त्यामुळे ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यावर शेतीचे काहीअंशी तरी नुकसान टळण्यास मदत होणार आहे. 
यासाठी नाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० च्या मर्यादेत  पाच वर्षांच्या परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाणार आहे. राज्य शासन, साखर कारखाना व शेतकरी  अशी संयुक्त योजना राबवली जाणार आहे.
एका शेतकºयाला पाच हेक्टर मर्यादेत दिले जाणारे कर्ज राज्य व जिल्हा बँकेकडून वितरित केले जाणार आहे.
--------------------
- सध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र
- राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र.
- त्यापैकी सध्या दोन लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली.
- उर्वरित ७.१८ लाख हेक्टर क्षेत्रापैैकी नद्या नाले, विहिरी, नैसर्गिक प्रवाह, ओढे आदीच्या पाण्यावरील क्षेत्र प्रामुख्याने ठिबकवर आणण्याचे शासनाचे आदेश आहेत.
- पहिल्या टप्प्यात १७-१८ मध्ये एक लाख ५ हजार व दुसºया टप्प्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ५५ हजार हेक्टर असे एकूण ३ लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
- कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्टÑातील आठ प्रकल्पाखालील ऊस ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट.

Web Title: Eight dams in the state are selected to bring down the cane crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.