दौंड- मनमाड सेक्शनमध्ये रेल्वेचा आठ दिवस ब्लॉक; विभागातून धावणाऱ्या दोन डेमू गाड्या रद्द
By Appasaheb.patil | Published: July 12, 2023 06:39 PM2023-07-12T18:39:51+5:302023-07-12T18:40:05+5:30
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सोलापूर : मध्य रेल्वेतीलसोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेने १२ ते २० जुलै २०२३ दरम्यान ट्रॉफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर धावणार्या दाेन डेमू गाड्या रद्द केल्या असून अन्य गाड्यांचे मार्ग बदलले आहे. शिवाय अनेक गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.
ट्रॉफिक ब्लॉकमुळे १९ ते २० जुलै रोजी धावणारी दौंड - निजामाबाद डेमू, निजामाबाद- दौंड डेमू रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही सोलापूर, दौंड, पुणेवरुन कुर्डूवाडी - पंढरपूर मार्गे रॅक जोडून चालविली जाणार आहे. याशिवाय १८ व १९ जुलै रोजी बेंगलूरू- न्यू दिल्ली एक्सप्रेस ही व्हाया दौंड, पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे धावणार आहे. हजरत निझामूद्दीन - वास्को -द- गामा एक्सप्रेस ही व्हाया, मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे, यशवंतपूर - हजरत निझामूद्दीन एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे तर लखनऊ- पुणे एक्सप्रेस ही व्हाया मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे धावणार आहे. यशवंतपूर - चंदीगड एक्सप्रेस ही व्हाया लोणावळा, वसई रोड, वडोदरा जं., रतलाम, संत हिरदाराम, मार्गे धावणार आहे.
या गाड्यांचे वेळापत्रकात बदल
पुणे - जबलपुर एक्सप्रेस, पुणे - हटिया एक्सप्रेस, पुणे - गोरखपुर एक्सप्रेस, पुणे - लखनऊ एक्सप्रेस, पुणे -हटिया एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शिवाय न्यू दिल्ली - बेंगलूरू एक्सप्रेस व पुणे - वीरांगना लक्ष्मी बाई एक्सप्रेस या गाड्या योग्यरित्या चालविण्यात येणार आहेत.