सांगोला शहरात आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:07+5:302021-05-05T04:37:07+5:30
सांगोला शहरात वाढणारा कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन ८ दिवस कडक जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या दोन ...
सांगोला शहरात वाढणारा कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन ८ दिवस कडक जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून अनेकजण कोरोनामुळे दगावले आहेत. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ६ ते १३ मे या दरम्यान गावातील दवाखाने व मेडिकल सेवा वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (किराणा दुकान, भाजीपाला, फळे व इतर सर्व दुकाने) १०० टक्के बंद ठेवण्याचा निर्णय नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, गटनेते आनंदा माने, सोमनाथ लोखंडे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कोट ::::::::::::::
सांगोला शहरात ८ दिवस कडकडीत जनता कर्फ्यू लागू केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तरुणांनी चौकात अगर वर्दळीच्या ठिकाणी गर्दी करून गप्पा मारत बसू नये. यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करावे.
- कैलास केंद्रे
मुख्याधिकारी