नव्याने आठ कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:15+5:302021-05-16T04:21:15+5:30

निमाच्या ४९ डॉक्टरांकडून १५० बेडची उभारणी माळशिरस : ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना ...

Eight new Kovid Hospitals are in service | नव्याने आठ कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत

नव्याने आठ कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत

Next

निमाच्या ४९ डॉक्टरांकडून १५० बेडची उभारणी

माळशिरस : ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे उपचारासाठी नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागत होती. याच अनुषंगाने निमा संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येत नातेपुते, माळशिरस, अकलूज, माळीनगर, श्रीपूर, वेळापूर या प्रमुख गावांमध्ये उपचार पद्धती उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून नुकतेच ८ हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये १५o ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

माळशिरस तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता मेडिकल सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल बेड व साधनसामग्रीची कमतरता भासत आहे. यामुळे निमा या वैद्यकीय संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील ४९ डॉक्टरांच्या पुढाकाराने विविध गावांमध्ये १५० ऑक्सिजनयुक्त बेड व इतर सुविधा रुग्णांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे महामारीत नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या ठिकाणी झाला श्रीगणेशा

श्रीपूर (२५ बेडचे श्रेयश कोविड हॉस्पिटल व २० बेडचे निदान कोविड हॉस्पिटल), माळीनगर (१० बेडचे माळीनगर कोविड हॉस्पिटल), अकलूज (२५ बेडचे कदम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल), वेळापूर (१५ बेडचे माने-देशमुख कोविड हॉस्पिटल), नातेपुते (१५ बेडचे नातेपुते मल्टीस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल), माळशिरस (३० बेडचे धन्वंतरी कोविड हॅस्पिटल, १० बेडचे माळशिरस कोविड हॉस्पिटल) अशा नव्याने आठ हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सुविधा असलेले १५० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.

----

महामारीचा सामना करण्यासाठी निमाच्या माध्यामातून अनेक डॉक्टर्सच्या पुढाकाराने नव्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध केली आहे. तालुक्यातील विविध तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने विविध गावात आणखी हॉस्पिटल व बालकांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे.

- डॉ. प्रवीण पाटील

अध्यक्ष, निमा संघटना, माळशिरस तालुका

Web Title: Eight new Kovid Hospitals are in service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.