अठरा दिवस कोरडे गेले... आता नुसत्या रिमझिम सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:08+5:302021-08-22T04:26:08+5:30
शुक्रवारी जिल्ह्यात अल्प पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात उत्तरमध्ये ६० मि.मी. पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यातच ऑगस्ट महिन्यात पावसाने सुटी ...
शुक्रवारी जिल्ह्यात अल्प पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात उत्तरमध्ये ६० मि.मी. पाऊस पडला आहे.
सोलापूर जिल्ह्यातच ऑगस्ट महिन्यात पावसाने सुटी घेतली होती. प्रदीर्घ विश्रांतीनंतर १८ ऑगस्ट रोजी रिमझिम पाऊस पडला. त्यानंतर २० ऑगस्टला जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी पडल्या. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाने चांगली बॅटिंग केली. तालुक्यातील पाच मंडळांत एकूण ३७.७ मि.मी. तर जिल्ह्यात एकूण अवघा ४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व माळशिरस या तालुक्यांत ४ ते ९ मि.मी. पाऊस पडला. इतर बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा व माढा तालुक्यांत अल्प पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक ६१ मि.मी. (६७ टक्के), माळशिरस तालुक्यात ३४ मि.मी. (६५ टक्के), मंगळवेढा तालुक्यात ३० मि.मी. (४८ टक्के), पंढरपूर व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी ३१ मि.मी., (४२ टक्के), सांगोला तालुक्यात २५ मि.मी., (३९ टक्के), माढा तालुक्यात २५ मि. मी., (३२.७ टक्के), बार्शी तालुक्यात २७ मि. मी (३१.७ टक्के), दक्षिण सोलापूर तालुक्यात २१ मि. मी. (२१ टक्के), अक्कलकोट तालुका १८ मि.मी. (१९.६ टक्के), तर करमाळा तालुक्यात १० मि.मी. (१५.२ टक्के) पाऊस पडला.
----
असा पडला पाऊस
वडाळा मंडळात ६७ मि.मी. पाऊस
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मंडळात सर्वाधिक ६७ मि.मी., मार्डी मंडळात ३७ मि.मी., शेळगी मंडळात २१ मि.मी., तिऱ्हे मंडळ २० मि.मी. तर सोलापूर मंडळात १३ मि.मी. असा शुक्रवारी रात्री २० ऑगस्ट रोजी उत्तर तालुक्यात एकूण ३१.७ मि.मी. पाऊस पडला.
- वैराग मंडळात ७ मि.मी., सावळेश्वर १२ मि.मी., चळे २० मि.मी., महाळुंग मंडळात ३१ मि.मी., पुळूज व कासेगाव प्रत्येकी १० मि.मी. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सर्व मंडळांत पाऊस पडला.
- गौडगाव, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, मोहोळ, शेटफळ, तुंगत, पटवर्धन कुरोली, पंढरपूर, भाळवणी, भंडीशेगाव, करकंब, इस्लामपूर, अकलूज, नातेपुते, माळशिरस, पिलीव, वेळापूर २ ते ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.