माळशिरस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:54+5:302021-07-07T04:27:54+5:30
पानीव येथील रोहित पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी खा.सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांच्याकडे केली होती. त्याची ...
पानीव येथील रोहित पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी खा.सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचे काम रोहित पवार यांनी केले आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळण्यासाठी निवेदन केले होते. या निवेदनाची दखल घेत खा. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांना ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर देण्याची सूचना केली होती. सदरची मागणी मान्य होऊन माळशिरस तालुक्यातील आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. कर्जत-आंबे जळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या हस्ते या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अरणचे सोळावे वंशज सावतामहाराज, रोहित पाटील, यशवंत पाटील, गोरख क्षीरसागर, अकलुज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. श्रणिक शहा, डाॅ. अजिक्य बंडगर, डाॅ. प्रवीण शिंदे, डाॅ. शुश्रुत शहा आदी उपस्थित होते.
----
माळशिरस तालुक्यात आरोग्याबरोबरच इतर काही समस्या असतील तर राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यास आपण कटिबध्द आहोत.
- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड
---
फोटो : ०६ माळशिरस
कर्जत-आंबे जळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या हस्ते ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण करताना उपस्थित मान्यवर.