लॉकडाऊनमुळे भटकंती करणाºया भिक्षुकांची एकादशी झाली बेघरांच्या निवाºयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:17 PM2020-07-02T12:17:18+5:302020-07-02T12:19:48+5:30
सोलापुरातील भिक्षुक पुनर्वसनाच्या वाटेवर; दोनवेळच्या आहारासह बहुतांश गरजांची पूर्तता
सोलापूर : शहरातील भिक्षुकांचा प्रश्न गंभीर झाला़ रेल्वेस्टेशन परिसरात दोन गाळ्यांमध्ये सुरू असलेला निवाराही अपुरा पडू लागला़ संस्था आणि संघटनांनी जोर लावताच महापालिकेने त्यांच्यासाठी कुष्ठरोग वसाहतीत दोन मजली बेघर निवारा उभारला़ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच साºया भिक्षुकांना या निवारा केंद्रात आणले गेले़ आज मंदिरंही बंद आहेत़ या लोकांनी प्रथमच आषाढी एकादशी ही मंदिराबाहेर न करता नव्या इमारतीत गोड केली.
आषाढ, श्रावणात सण-उत्सवांना सुरुवात होते़ या काळात बेघर, भिक्षुकांची संख्या मंदिराबाहेर वाढते़ त्यांच्या अनारोग्याचाही प्रश्न या काळात पुढे आला़ सोलापुरातील भिक्षुकांची स्थिती पाहता रेल्वे स्टेशन परिसरात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती़ तीही व्यवस्था अपुरी पडू लागली़ या सण, उत्सवात मिळेल ते खाणे, फराळांचे पदार्थ गोळा करणे, अनारोग्य निर्माण करणे, मंदिर परिसर अस्वच्छता करणे असे प्रकार व्हायचे़ लॉकडाऊन काळात यांचा प्रश्न गंभीर होता़ या साºयांसाठी कुमठा नाका परिसरात कुष्ठरोग वसाहतीत नव्याने ‘बेघर निवारा केंद्र’ उभारले गेले़ ७ फेब्रुवारी २०२० रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले; मात्र या काळात सर्व भिक्षूक मिळत नव्हते़ कोरोना काळात काही संस्था, संघटनांकडून पाठपुरावा झाला आणि साºयांची एकाच ठिकाणी व्यवस्था झाली़ सध्या या केंद्रात सात महिला आणि १३ पुरुष आहेत़ आषाढी एकादशी काळात या भिक्षुकांची विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबाहेर गर्दी व्हायची़ यंदा त्यांनी आषाढी एकादशी मंदिराबाहेर ऐवजी या केंद्रातच गोड केली.
परप्रांतीय भिक्षुकांना मायभूमीत हलविले
शहरात भिक्षुकांची खरी संख्या वाढली ती बाहेरील राज्यातूऩ २३ मार्च रोजी लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली़ बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात अनेक बेघर, विस्थापित अडकून पडले़ त्यांना जाण्यासाठी ना पैसे, ना वाहन, ना निवाºयाची व्यवस्था़ अशांना कुष्ठरोग वसाहतीतील बेघर केंद्रात निवारा देण्यात आला़ महिनाभरापूर्वी मायभूमीत पाठवण्याची सरकारकडून व्यवस्था झाली़ स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करुन १०८ लोकांना बिहार, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेशात मायभूमीत सोडण्यात आले़ येथील व्यवस्थापनेने बहुतांश लोकांचा मूळ निवासाचा पत्ता शोधून काढून कुटुंबांशी संपर्कही करुन दिला़
शहरातील सर्व मंदिराबाहेरील भिक्षुकांना नव्याने उभारलेल्या बेघर केंद्रात आणण्यासाठी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला़ तत्पूर्वी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन त्यांची संख्याही ठरवली़ तो पालिका आयुक्तांपुढे ठेवला़ त्यासाठी पाठपुरावा करत आहे.
-आतिश शिरसट
संभव फाउंडेशन
नव्या निवारा केंद्रात महापालिकेने दोनवेळ आहार, चहा-नाश्ताची व्यवस्था केली आहे़ शिवाय त्यांच्या आरोग्यासाठी एका डॉक्टरची व्यवस्था झाली आहे़ केंद्राची स्वच्छता अन् त्यांची आरोग्य तपासणी होते़ बºयाचदा मद्यपान, धूम्रपान व्यसनामुळे काही लोक येथे थांबायला नकार द्यायचे़ आता त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला़ व्यसनमुक्तीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे़
- मनोहर बारिया
व्यवस्थापक, बेघर निवारा केंद्र