वांगीच्या वादग्रस्त जमिनींंच्या विविध प्रश्नांवरून वृद्धेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:58+5:302020-12-22T04:21:58+5:30

बहुजन हक्क अभियान संघटनेमार्फत हे आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्त्यांंनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या संबंधित उपोषणाबाबतच्या अर्जात म्हटले आहे की, करमाळा ...

Elderly fast on various issues of disputed lands of Wangi | वांगीच्या वादग्रस्त जमिनींंच्या विविध प्रश्नांवरून वृद्धेचे उपोषण

वांगीच्या वादग्रस्त जमिनींंच्या विविध प्रश्नांवरून वृद्धेचे उपोषण

Next

बहुजन हक्क अभियान संघटनेमार्फत हे आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्त्यांंनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या संबंधित उपोषणाबाबतच्या अर्जात म्हटले आहे की, करमाळा तहसीलदारांकडील मागासवर्गीय वतन अहवालाप्रमाणे मागासवर्गीय वतनदार यांच्या मालकाच्या शेतजमिनीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर शेतकऱ्यास योग्य ती समज देण्यात यावी. शेतजमीन गट नं. ३८५, ३८६, ३८६/५ याबाबत तात्काळ पोलीस संरक्षण देत ताबा देण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर तहसीलदारांनी बार्शी न्यायालयाच्या आदेशाचा त्यांच्याकडील फेरचौकशीचा अहवाल कलम १४५च्या कारवाईचा अहवाल प्रलंबित असतानाही सन २०१५-१६ मध्ये सरकार जमा असलेल्या शेतजमिनीतून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांना पीकपाणी काढून देण्यासाठी पोलीस संरक्षण दिले होते याचीही खातेनिहाय चौकशी व्हावी.

या चक्री उपोषणात वांगी येथील मागासवर्गीय वतनदार यांच्यातर्फे महादेव गबाजी कांबळे, कसुदाबाई बजरंग कांबळे, सुशीलाबाई रघुनाथ कांबळे यांनी सहभाग नोंदवला आहे.

फोटो ओळ-

कुर्डूवाडी उपविभागीय दंडाधिकारी ज्योती कदम यांच्या कार्यालयासमोर वांगी (ता. करमाळा) येथील महिला व पुरुष चक्री उपोषणास बसले आहेत.

===Photopath===

211220\21sol_1_21122020_4.jpg

===Caption===

कुर्डूवाडी उपविभागीय दंडाधिकारी जोती कदम यांच्या कार्यालयासमोर वांगी (ता.करमाळा) येथील महिला व पुरुष चक्री उपोषणास बसले आहेत.

Web Title: Elderly fast on various issues of disputed lands of Wangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.