अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:32+5:302020-12-07T04:16:32+5:30

डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास बार्शी-उस्मानाबाद रोडवरील चिखर्डे हद्दीत घडली. बब्रुवान खंडू वीर (वय ६५, रा. चिखर्डे) असे ...

An elderly man was killed in a collision with an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने वृद्ध ठार

Next

डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास बार्शी-उस्मानाबाद रोडवरील चिखर्डे हद्दीत घडली. बब्रुवान खंडू वीर (वय ६५, रा. चिखर्डे) असे त्या वृद्धाचे नाव आहे.तानाजी बब्रुवान वीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, ५ रोजी माझे वडील बब्रुवान वीर हे रात्रीची लाईट असल्याने ते शेतातच थांबले होते, परंतु लाईट न आल्याने उशिरा पायी चालत घराकडे येत होते. दरम्यान, ते सरकारी दवाखान्याच्या जवळ येताच अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागून रक्तस्राव होऊन जागीच ठार झाले. तेव्हा नारीकडून नीलेश सुभाष कोंढारे व सूरज भैरव होणारे हे गावाकडे येताना त्यांना रोडवर अपघात झालेला दिसला. तत्काळ फोन करून सांगितले. घटनास्थळी जाऊन पाहिले असता वडीलच असल्याची खात्री झाल्यानंतर पांगरी पोलिसात जाऊन फिर्याद दिली. याबाबत पांगरी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट हे करीत आहेत.

फोटो

०६बब्रुवान वीर ठार

Web Title: An elderly man was killed in a collision with an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.