चौघांच्या मारहाणीत पती-पत्नीसह वृद्ध महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:35 AM2020-12-14T04:35:23+5:302020-12-14T04:35:23+5:30

नीलावती बुरंगे यांची बुरंगेवाडी व सोनंदच्या हद्दीत शेती आहे. त्या शेतीला लागून सोनंद येथील आनंदराव काशीद यांची शेतजमीन आहे. ...

An elderly woman and her husband were injured in the attack | चौघांच्या मारहाणीत पती-पत्नीसह वृद्ध महिला जखमी

चौघांच्या मारहाणीत पती-पत्नीसह वृद्ध महिला जखमी

Next

नीलावती बुरंगे यांची बुरंगेवाडी व सोनंदच्या हद्दीत शेती आहे. त्या शेतीला लागून सोनंद येथील आनंदराव काशीद यांची शेतजमीन आहे. शनिवारी आनंदराव काशीद हे दोघांमध्ये असलेल्या बांधावर गवत कापण्यासाठी आले असता नीलावती बुरंगे व अशोक बुरंगे या पती-पत्नीने सदरचा बांध सामाईक असून, गवत कापू नका असे समजावून सांगत होते. त्यावेळी आनंदराव काशीद यांनी सदरचा बांध माझा आहे म्हणून अरेरावीची भाषा वापरून मुलगा तुषार काशीद व पत्नी रुक्मिणी काशीद यांना बोलावून घेतले. दरम्यान, सदरचा प्रकार काय चालला आहे, भांडण कशासाठी लागले म्हणून सासू द्रौपदी बुरंगे त्याठिकाणी आल्या असता तिलाही वरील लोकांनी शिवीगाळ दमदाटी केली. त्यादरम्यान आनंदराव काशीद याने सासू द्रौपदी हिच्या डाव्या मनगटावर काठीने मारून जखमी केले, तर मुलगा तुषार काशीद यांनी उडी मारण्याच्या दोरीने नीलावती बुरंगे यांना मारून जखमी केले. यावेळी शेजारी शेळ्या राखणारे श्रीरंग बुरंगे, अण्णा बुरंगे यांनी भांडण सोडवासोडवी केल्याने ते तिघेजण निघून गेले. याबाबत नीलावती बुरंगे (रा. बुरंगेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: An elderly woman and her husband were injured in the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.