२०१९ ची निवडणूक ऐतिहासिक असेल : भालचंद्र कानगो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:37 PM2018-10-13T12:37:14+5:302018-10-13T12:41:23+5:30
निवडून कोण येणार, यापेक्षा देशाची वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होणार, हे ठरविणारी ही निवडणूक ऐतिहासिक असेल.
सोलापूर : १९४७ नंतरच्या निवडणुकीचे स्वप्न या देशाला महान बनविण्याचे होते. मात्र, ज्यांनी या स्वातंत्रलढ्यावर बहिष्कार घातला होता तीच मंडळी आज देश महासत्ता बनवायला निघाली आहेत. निवडून कोण येणार, यापेक्षा देशाची वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होणार, हे ठरविणारी ही निवडणूक ऐतिहासिक असेल, असे प्रतिपादन भारतील कम्युनिष्ट पक्षाचे राष्टÑीय सचिव डॉ़ भालचंद्र कानगो यांनी सोलापुरात केले.
सोलापुरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. डॉ. पुढे कानगो म्हणाले, महान देश आणि महासत्ता देश यात फरक आहे. महासत्तेच्या वाटचालीत उद्दामपणा असतो. सर्वसामान्य माणसांना महासत्ता बनविण्याचे हत्यार म्हणून वापरले जाते. सध्या जे दिसत आहे, ते विचार करायला भाग पाडणारे आहे. मजूर हा देशाचा कणा असतो.
जो देश श्रमिकांना सलाम करतो, तोच पुढे जातो. मात्र आज माणसांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. विचारवंत आणि लेखकांना पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक जीवनात वावरावे लागत आहे. हा देश फॅसिझमच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे लक्षण आहे, असा धोक्याचा इशाराही त्यान्ांी दिला.