माळशिरस तालुक्यात ४२ गावात निवडणुकीची रंगत; पाच ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:32+5:302021-01-08T05:09:32+5:30
ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायती अथवा काही बोर्डमधील उमेदवार बिनविरोध होण्याचा दुर्मीळ योगायोग पाहायला ...
ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायती अथवा काही बोर्डमधील उमेदवार बिनविरोध होण्याचा दुर्मीळ योगायोग पाहायला मिळतो. ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. यापैकी महाळुंग ग्रामपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे ४८ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल झाले होते. यापैकी कुरबावी, गोरडवाडी, गिरझणी, मिरे व बाभूळगाव या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. याशिवाय काही गावातील उमेदवारही बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रंगत पाहायला मिळणार आहे.
४८ गावातील १८३ वॉर्डातून ५१४ सदस्य ग्रामपंचायतीवर जाणार आहेत. या टप्प्यात १८९१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० अवैध ठरल्यामुळे मैदानात १८५१ अर्ज राहिले होते. त्यापैकी
... जणांनी
माघार घेतली. त्यामुळे ४२ गावातील निवडणुकीसाठी उमेदवार... आपले नशीब आजमावणार आहेत.
फोटो.....
गोरडवाडी (ता. माळशिरस) ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे गावकऱ्यांनी काढलेली मिरवणूक.