सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर, ५ डिसेंबरपासून अर्ज भरा; २६ डिसेंबरला होणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:58 PM2017-11-18T12:58:13+5:302017-11-18T12:59:37+5:30
जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : जानेवारी-फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये माढा तालुक्यातील टेंभुर्णी, तुळशी, करमाळा तालुक्यातील जेऊर, माळशिरस तालुक्यातील माळीनगर अशा मोठ्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. नव्याने ६४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीही थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवेढा अािण करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
--------------------------
या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार
पंढरपूर : ईश्वर वठार. माढा : अंजनगाव खे., पिंपळखुंटे, आढेगाव, वडशिंगे, अंबाड, लोणी/नाडी, मुंगशी, कन्हेरगाव, तुळशी, वडोली, चांदज, टेंभुर्णी. माळशिरस : माळीनगर, धर्मपुरी, कारुंडे, वाफेगाव. मंगळवेढा : शिरसी, अकोला, खडकी, जंगलगी, जुनोनी, खुपसंगी, महमदाबाद (हुन्नूर), बठाण, आंधळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रह्मपुरी, निंबोणी, जालीहाळ/सिद्धनकेरी, मुंढेवाडी, नंदूर, भाळवणी, चिकलगी, हिवरगाव, दक्षिण सोलापूर : गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, कुसूर/खानापूर, दोड्डी, वळसंग. अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी. बार्शी : उंडेगाव, मुंगशी (वा), आंबाबाईची वाडी, सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहूद/बंडगरवाडी. करमाळा : राजुरी, भगतवाडी/गुलमरवाडी, जेऊर, गौंडरे, उंदरगाव, कोर्टी/हुलगेवाडी, चिखलठाण, कंदर, निंभोरे, वीट, केत्तूर, रामवाडी, घोटी.
------------------
असा असेल निवडणूक कार्यक्रम
२४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होणार. ५ डिसेंबर ते ११ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत, १२ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी, १४ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत व चिन्ह वाटप, २६ डिसेंबरला मतदान आणि २७ डिसेंबरला मतमोजणी.