नगरपंचायत आरक्षण सोडतीने निवडणुकीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:23 AM2021-02-11T04:23:59+5:302021-02-11T04:23:59+5:30
नगरपंचायतीच्या एकूण सतरा प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठीच्या तीनपैकी अनुसूचित महिला राखीव २, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या पाचपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ...
नगरपंचायतीच्या एकूण सतरा प्रभागांपैकी अनुसूचित जातीसाठीच्या तीनपैकी अनुसूचित महिला राखीव २, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या पाचपैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ३ व सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या नऊपैकी सर्वसाधारण महिलांसाठी ४ असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी प्रणव सावंत या विद्यार्थाने आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, डॉ. मारुती पाटील, तुकाराम देशमुख, सुरेश टेळे, मारुती देशमुख, विजय देशमुख, सचिन वावरे, पाडुरंग वाघमोडे, विकास धाईंजे, आकाश सावंत, गजानन पाटील, संतोष वाघमोडे, आकाश सिद, सुरेश वाघमोडे, अनिल सावंत, सुरेश वाघमोडे, गंगाधर पिसे, आबा धाईंजे यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
आरक्षण सोडत
वाॅर्ड क्र. १ अनुसूचित जाती, वाॅर्ड क्र. २ नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), वाॅर्ड क्र. ३ सर्वसाधारण (महिला), वाॅर्ड क्र. ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाॅर्ड क्र. ५ सर्वसाधारण (महिला), वाॅर्ड क्र. ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाॅर्ड क्र. ७ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), वाॅर्ड क्र. ९ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. १० सर्वसाधारण (महिला), वाॅर्ड क्र. ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), वाॅर्ड क्र. १२ अनुसूचित जाती (महिला), वाॅर्ड क्र. १३ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. १४ अनुसूचित जाती (महिला), वाॅर्ड क्र. १५ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. १६ सर्वसाधारण, वाॅर्ड क्र. १७ सर्वसाधारण (महिला) अशी आरक्षण सोडत निघाली आहे.