निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:06 PM2019-04-04T14:06:33+5:302019-04-04T14:10:23+5:30

बार्शीच उस्मानाबादचा केंद्रबिंदू : कार्यकर्ते मैदानात न उतरता पडद्यामागून डाव साधण्याच्या तयारीत

Election of Lok Sabha; But the debate in the Barshi constituency is still in the assembly | निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच

निवडणूक लोकसभेची; पण बार्शी मतदारसंघात चर्चा मात्र विधानसभेचीच

Next
ठळक मुद्देउस्मानाबाद लोकसभेची निवडणूक होत असली तरी बार्शी मतदारसंघात मात्र विधानसभेची चाचपणीबार्शी मतदारसंघात लोकसभेच्या मतदानाच्या आघाडीवर विधानसभेचा अजेंडा ठरणार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बार्शी या सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाचा समावेश

भ. के. गव्हाणे 

बार्शी : उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक होत असली तरी बार्शी मतदारसंघात मात्र विधानसभेची चाचपणी करण्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहे. बार्शी मतदारसंघात लोकसभेच्या मतदानाच्या आघाडीवर विधानसभेचा अजेंडा ठरणार असल्याने बार्शी मतदारसंघात भाजप, सेना, काँग्रेस, राष्टÑवादी, आरपीआय, भारिप, बहुजन महासंघ  कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात बार्शी या सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाचा समावेश असल्याने हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या घडामोडीचा केंद्रबिंदू आहे. 

लोकसभेतील उमेदवाराची तुल्यबळ बलस्थाने या मतदारसंघात आहेत. पण विधानसभा डोक्यात ठेवून मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका कोणाला यावर सध्या खलबते सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बार्शी विधानसभा मतदारसंघातील मतांची मोट बांधण्याचे काम सध्या बैठकामध्ये सुरू असून, पक्षाचे कार्यकर्ते विविध गटात विखुरलेले आहेत. बाजार समिती, ग्रामपंचायती यामध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी करून सत्ता स्थापन केली असली तरी लोकसभेच्या निवडणुकीत मात्र पक्षाचे काम करावे लागणार असल्याने कार्यकर्ते मैदानात न उतरता पडद्यामागून आपला डाव साधण्याच्या स्थितीत दिसत आहेत.

या मतदारसंघाच्या २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे प्रा. रवी गायकवाड हे निवडून आले होते, पण त्यानंतर मात्र विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच पक्षप्रमुख स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपापली ताकद अजमावली आहे. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणे युती, आघाडी करून लढविल्या जात आहेत. त्यामुळे विधानसभेचा अजेंडा हा लोकसभेच्या निवडणुकीवर असल्याने कोणाच्या पारड्यात किती मते पडणार, याची गोळाबेरीज करण्यात कार्यकर्ते जोमाने कामास लागलेले दिसत आहेत.

भविष्यातील विधानसभेचा अजेंडा लक्षात घेता लोकसभेत सत्ताधाºयांची विकासाची कामे, जनसंपर्क संघर्ष यात्रा, संपर्क अभियान, विरोधक म्हणून घेतलेली भूमिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली कामे लहान-मोठ्या समाजाला सत्तेत दिलेले प्रतिनिधित्व, अशा बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. लोकसभेमध्ये असलेल्या उमेदवाराचे पक्ष हे युती आघाडीमध्ये एकत्रित आहेत. पण विधानसभेचे चित्र अद्यापही अस्पष्ट असल्याने भविष्यात प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास किंंवा युती, आघाडी होऊन कोणाच्या वाट्याला हा मतदारसंघ यावा, यासाठी लोकसभेतील मतांची आकडेवारी लक्षात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बार्शी मतदारसंघात या लोकसभेच्या निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता प्रारंभापासून दिसत आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
- लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रातील व राज्यातील शासनाकडून जी आश्वासने देऊनही शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेच्या हाती काहीच दिले नाही. नोटाबंदी, जीएसटी, राफेल घोटाळा, यावर विरोधक टीका करताना दिसत असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून केंद्र व राज्यातील शासनाने शेतकºयांचा पीकविमा, अचानक झालेल्या गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत याबरोबरच कांदा अनुदानाबरोबरच दुष्काळ अनुदान याची मदत केली असल्याचे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर चिखलफेक करीत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Election of Lok Sabha; But the debate in the Barshi constituency is still in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.