मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक अविरोध
By Admin | Published: May 23, 2014 01:06 AM2014-05-23T01:06:28+5:302014-05-23T01:06:28+5:30
पिता-पुत्राची सत्ता : १२ जुने तर ४ नवे चेहरे
सोलापूर : येथील मराठा समाज सेवा मंडळाची निवडणूक अविरोध झाली असून त्याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार आहे. मंडळावर सपाटे पिता-पुत्राची सत्ता आली आहे. शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मराठा समाजसेवा मंडळाची १५ जागांसाठी ५५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४० जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५ जणांचेच अर्ज राहिले. येत्या रविवारी यासाठी मतदान होणार होते. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच ही निवडणूक अविरोध झाली आहे. याची औपचारिक घोषणा रविवारी केली जाणार आहे. मराठा समाज सेवा मंडळाच्या बैठकीत विद्यमान अध्यक्ष मनोहर ्रसपाटे यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले होते. त्यांनी विद्यमान चांगदेव इगळे, लता जाधव व मधुकर इंगोले यांना डच्चू दिला तर नारायण शिंदे या संचालकाचे निधन झाले. त्यामुळे या चार जागांवर नवे चेहरे घेण्यात आले आहेत. यामध्ये सपाटे यांनी त्यांचे चिरंजीव अॅड. बाबासाहेब सपाटे यांची वर्णी लावली आहे. अविरोध निवडण्यात आलेले पदाधिकारी व संचालक याप्रमाणे, अध्यक्ष- मनोहर सपाटे, उपाध्यक्ष- अॅड. सुभाष साळुंके, सरचिटणीस- प्रा. महेश माने, चिटणीस- विनायक पाटील, खजिनदार- निवृत्ती केत, संचालक - अॅड. दादासाहेब देशमुख, हणमंतु बेसुळके, मोहन गोरे, नागनाथ डिगे, शहाजी सुर्वे गुरुजी, अॅड. दत्तात्रय पवार. हे सर्व विद्यमान सदस्य आहेत. नव्याने घेण्यात आलेले संचालक याप्रमाणे अॅड. बाबासाहेब सपाटे, नामदेव थोरात, हरिश्चंद्र बचुटे. महिला संचालिका- सुशीला शिंदे.
-------------------------
१९९३ पासून सपाटे यांचे वर्चस्व ४सोलापुरात मराठा समाज सेवा मंडळाच्या अधिपत्याखाली मोठा शिक्षणविस्तार झाला आहे. या मंडळावर १९९३ पासून माजी महापौर मनोहर सपाटे यांचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीमध्ये सपाटे यांना त्यांच्या विरोधकांनी हैराण केले होते. पण या खेपेस त्यांच्या विरोधकांनी तलवार म्यान केल्याने सपाटेंच्या नेतृत्वाखाली मंडळाची निवडणूक अविरोध झाली आहे.