सहा ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:11+5:302021-01-08T05:11:11+5:30
बोरामणी ग्रामपंचायत निवडणूक आलटून-पालटून बिनविरोध होण्याची परंपरा आहे. येथील निवडणूक चुरशीची ठरते; मात्र यंदा ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर निवडणूक ...
बोरामणी ग्रामपंचायत निवडणूक आलटून-पालटून बिनविरोध होण्याची परंपरा आहे. येथील निवडणूक चुरशीची ठरते; मात्र यंदा ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
- रत्नाबाई राजगुरू, महेंद्र राजगुरू, पुष्पावती आवटे, सुभाष भोसले, राजकुमार राठोड, अनुसया राठोड, ज्योती देशमुख, आकाश माशाळे, अरुणा साळुंखे, महादेव माळी, स्वाती रोकडे, सैपन मुलुक फुलारी, मुनीरउद्दीन पठाण, वैभव हलसगे, स्वप्नाली पटणे, भीम पवार, नामाप्रच्या एका जागेसाठी पाच अर्ज आले होते, त्या सर्वांनीच माघार घेतल्याने ही जागा रिक्त असणार आहे.
दिंडूर ग्रामपंचायत- जयश्री घोडके, गीता हुले, शिवलिंग अप्पा बिराजदार, शिल्पा कुलकर्णी, आशाराणी मिरजे, धालिंग हुळले, ललिता तूपसाखरे, राजेश घोडके, बसवराज मिरजे. लिंबिचिंचोळी- स्वाती गायकवाड, हिराचंद गुरव, रत्नाबाई कलशेट्टी, ऊर्मिला चिंचोळकर, श्रीकांत कोरे, दस्तगीर माशाळे, गीतांजली माळी, सावित्री सुरवसे, संतोष हक्के. तीर्थ - काशीबाई शारू चव्हाण, पैगंबर मुल्ला, रेणुका पाटील, नूरबनवी शेख, राणी उदंडे, शांतप्पा चितळे, आम्रपाली वाघमारे, सुप्रिया वळसंगे, धानप्पा घाडगे. संगदरी - राणी सौदागरे, संगव्वा रगबले, महादेव अंबारे, इस्माईल मुल्ला, जगदेवी कारभारी, पद्मसिंह शिवशेट्टी, किरण राजगुरू, मल्लिनाथ हदरे (अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी अर्ज आला नाही त्यामुळे रिक्त)
बाळगी - शिवकुमार बगले, संगव्वा कोळी, जुबेदाबी मुल्ला, संगप्पा कोळी, सुवर्णा अणचे, रत्नाबाई कोळी, श्रीदेवी बिडवे, भीमाशंकर मनकाळे, शीलवंती मोची.
---------
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती - ५२
बिनविरोध ग्रामपंचायती -६
बिनविरोध प्रभाग - ३४
प्रत्यक्ष निवडणूक - ४६ ग्रामपंचायती
निवडणुकीचे प्रभाग - १४४
मतदान केंद्र - १७४
साहाय्यकारी मतदान केंद्र - ३०
------------