सोलापूर/बार्शी बाजार समिती निवडणुक ; निवडणूक कर्मचाºयांना मताधिकार नाहीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:49 PM2018-06-28T14:49:16+5:302018-06-28T14:49:56+5:30
बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
सोलापूर : बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. याचा फटका सोलापूर आणि बार्शी बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या २ हजारांहून अधिक कर्मचाºयांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण शिवछत्रपती रंगभवन येथे झाले. यावेळी बाजार समितीच्या शेतकरी मतदार यादीत नावे समाविष्ट असलेल्या कर्मचाºयांनी आपल्या मतदानाचे काय? असा प्रश्न निवडणूक निर्णय अधिकाºयांना विचारला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक प्राधिकरणाने कर्मचाºयांना मतदान करण्याची तरतूद केली नाही, अशी माहिती दिली.
सहकार निवडणूक प्राधिकरणाने याबाबत निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये कुजबूज सुरु झाली. अनेक कर्मचाºयांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांना याबाबत माहिती दिली. आम्हाला मतदानाचा अधिकार द्यायचा नव्हता तर मतदार यादीत नावे का समाविष्ट केली, असा प्रश्नही मतदान प्रक्रियेसाठी नेमलेल्या काही शिक्षकांनी उपस्थित केला.
याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दाद मागू, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. शासकीय कर्मचाºयांना निवडणुकीत भाग घेता येत नाही . मात्र त्यांना मतदान करता येते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी सोयही करुन दिली आहे. परंतु, सहकार निवडणूक प्राधिकरणाने तशी सोय केलेली नाही. याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
माहेरवासिणीने जुनी ओळख पटवून द्यावी
- प्रशिक्षण कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. सातबारा उताºयावर भागीदार म्हणून महिलांची नावे असतात. या नोंदीवरुन मतदार यादीत महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादीत अनेक महिलांची माहेरची नावे-आडनावे आली आहेत. त्या मतदानाला आल्या तर काय करायचे, असा प्रश्न कर्मचाºयांनी उपस्थित केला. त्यावर त्यांना माहेरच्या नावाने-आडनाव असलेले ओळखपत्र दाखवायला सांगावे. मतदान केंद्राध्यक्षाने याबाबत निर्णय घ्यावा, असेही प्रशासनाकडून सुचविण्यात आले. या निवडणुकीत टपाली मतदानाची तरतूद नाही तसेच निवडणूक कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. असे निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले.