२२५ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:13+5:302021-02-06T04:39:13+5:30
माळशिरस तालुक्यातील २२५ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. शासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एक वर्षापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या ...
माळशिरस तालुक्यातील २२५ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. शासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एक वर्षापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. निवडणुकांसाठी प्रथम १७ जून २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ती मुदत वाढवून १६ सप्टेंबरपर्यंत केली. या पुढेही मुदतवाढ ३१ डिसेंबरपर्यंत केली. त्यानंतर ३१ मार्च २०२१ पर्यंत या निवडणुकांना स्थगिती दिली होती. गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानपरिषदेच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तसेच माळशिरस तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी केलेल्या निवेदनाचा विचार करून सहकारी संस्था निवडणूक स्थगिती उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यामध्ये आता मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच चालू करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. यामुळे संस्थांना दिलासा मिळाला आहे. अ वर्गात १४, ब वर्गात ११६, क वर्गात ६० व ड वर्गात ३५ संस्थांचा समावेश आहे.
कोट ::::::::::::
निवडणूक प्राधिकरणाकडून सूचना आल्यानंतर टप्प्या-टप्प्याने माळशिरस तालुक्यातील २२५ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील.
- देविदास मिसाळ,
सहाय्यक निबंधक,अकलूज