सहकार निवडणुका; रोहित पवार म्हणाले.. मतभेद कमी करण्याची जबाबदारी माझ्याकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:06 PM2022-04-09T13:06:56+5:302022-04-09T13:07:40+5:30

सोसायटी व सहकारी संस्था, ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने कधी कधी अनेक पॅनलमध्ये आपलीच लोकं असतात. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पॅनल कशा पध्दतीने होतात, कोण कोण इच्छुक आहेत हे पाहावे लागणार आहे.

Elections of societies; Rohit Pawar said .. I have the responsibility to reduce differences! | सहकार निवडणुका; रोहित पवार म्हणाले.. मतभेद कमी करण्याची जबाबदारी माझ्याकडे!

सहकार निवडणुका; रोहित पवार म्हणाले.. मतभेद कमी करण्याची जबाबदारी माझ्याकडे!

googlenewsNext

सोलापूर - पंढरपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार रोहित पवार यांनी घेतली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कल्याणराव काळे, भगीरथ भालके, सुधीर भोसले, विजय काळे उपस्थित होते. पुढे आमदार पवार म्हणाले, सर्व वेगवेगळे गट मिळून राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी लढण्यासाठी आपल्या ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढे कसे जाता येतील, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सोसायटी व सहकारी संस्था, ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने कधी कधी अनेक पॅनलमध्ये आपलीच लोकं असतात.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पॅनल कशा पध्दतीने होतात, कोण कोण इच्छुक आहेत हे पाहावे लागणार आहे. परंतु पुढचे पॅनल पूर्ण भाजपाचा असेल तर राष्ट्रवादीतील मतभेद शांत करून आपल्याच विचारचे पॅनल कसा बसवता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

..तर कारखाना चालू शकणार नाही

आपल्याला हा कारखाना बाहेर कशा अर्थाने काढता येईल. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. कधी कधी राजकारण डोक्यात घेऊन त्या पध्दतीने निवडणूक लढली तर कारखाना ताब्यात येऊ शकतो. परंतु कारखाना चालू शकेल की नाही, हे सांगता येणार नाही. त्यामुळे कारखाना नीट चालवण्याची गरज असल्याचे मला वाटत आहे. कारखान्याला ताकद देण्याची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांची वास्तू आपल्या तालुक्यात आहे. त्याला चांगला इतिहास आहे. हा कारखाना पुढे चांगला चालेल कसा हे बघण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Elections of societies; Rohit Pawar said .. I have the responsibility to reduce differences!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.