इलेक्ट्रिक मोटार चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:26+5:302021-07-07T04:27:26+5:30
नजीर नूरमहंमद मुलाणी (वय ५६, रा. झिंजेवस्ती, ता. माळशिरस) यांनी झिंजेवस्ती गावच्या शिवारात निरा उजवा कालव्याजवळील शेतातील विहिरीमध्ये एक ...
नजीर नूरमहंमद मुलाणी (वय ५६, रा. झिंजेवस्ती, ता. माळशिरस) यांनी झिंजेवस्ती गावच्या शिवारात निरा उजवा कालव्याजवळील शेतातील विहिरीमध्ये एक पानबुडी पाण्याची मोटार बसविली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत माळशिरस पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपींचा सपोनि शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने शोध घेतला. गोपनीय बातमीदारांकडून या विहिरीतील विद्युत पाणबुडी मोटर कुसमोड, पिलीव येथील चोरट्यांनी चोरल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक ५ एचपीची पाणबुडी विद्युत मोटार व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली. या गुन्ह्याचा तपास करताना कुसमोड येथील पाणबुडी मोटारीच्या चोरीचा गुन्हा उघड झाला. यामध्ये पोलिसांनी दोन पाणबुडी मोटार व दुचाकी असा ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या गुह्यात दोघांना अटक केले असून एक विधीसंघर्षित बालक आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पोलीस हवालदार पंडित मिसाळ, पोलीस नाईक राहुल वाघ, पोलीस हवालदार दत्ता खरात, सतीश धुमाळ, कुकाटे यांनी कारवाई केली.