सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार, महावितरणची व्यवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:16 AM2017-11-24T11:16:47+5:302017-11-24T11:18:39+5:30
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २५ व २६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे २५ व २६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी 'शून्य थकबाकी मोहीम' वेगात सुरू आहे. यात बिलांचा भरणा न केल्यास थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकीत देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. २५) व रविवारी (दि. २६) सार्वजनिक सुटी असली तरी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.
याशिवाय चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह महावितरणची वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे 'आॅनलाईन' सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.