अबब! हाय टेन्शन तारेवरून आकडे टाकून चोरली 81 हजारांची वीज; 7 जणांवर गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Published: August 5, 2023 05:31 PM2023-08-05T17:31:47+5:302023-08-05T17:32:28+5:30
सात जणांनी चोरून ८१ हजारांची ५,१२४ युनिट विजेचा वापर केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
सोलापूर/बार्शी - महावितरण कंपनीच्या चालू विद्युत प्रवाहाच्या वायरवर तारेचे आकडे टाकून चोरून वीज वापरल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांनी चोरून ८१ हजारांची ५,१२४ युनिट विजेचा वापर केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
याबाबत कनिष्ठ अभियंता पिंपळनेर, तंत्रज्ञ दत्ता पोळ यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राहुल गोडसे, राजकुमार लोंढे, दादा मिसाळ, सुमित्रा घाडगे, शंकर साडेकर, दत्तात्रय साडेकर आणि पांडुरंग आवारे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण विभागाने राबवलेल्या चौकशी माेहीममध्ये सातजण विनापरवानगी वीज वापरत असल्याचे आढळून आले. आकडे टाकून वीज वापरत असल्यामुळे त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.