भ्रष्टाचार निर्मूलन स्वत:पासून करा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्ह्यात दक्षता व जनजागृती सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:33 AM2017-11-03T11:33:47+5:302017-11-03T11:49:48+5:30

भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. या किडीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे केले.

Elimination of corruption from self: District Collector Rajendra Bhosale, District Vigilance and Publications Week | भ्रष्टाचार निर्मूलन स्वत:पासून करा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्ह्यात दक्षता व जनजागृती सप्ताहास प्रारंभ

भ्रष्टाचार निर्मूलन स्वत:पासून करा : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्ह्यात दक्षता व जनजागृती सप्ताहास प्रारंभ

Next
ठळक मुद्देभ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यकगाव पातळीपर्यंत त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ :  भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. या किडीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.
दक्षता व जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते. कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, ब्रिगेडयर सुनील बोधे, कर्नल विकास कोल्हे, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विधिज्ञ नीलेश जोशी यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, चुकीच्या कामाला वेळीच विरोध करण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. जनतेने मागितलेली माहिती त्यांना उपलब्ध करून देणे हे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे उत्तरदायित्व आहे असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले. ज्ञान ही प्रत्येकाची शक्ती असून प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना मिळवून देण्यासाठी यंत्रणेने काम करावे असेही ते म्हणाले.
 पोलीस आयुक्त तांबडे म्हणाले, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाची जनजागृती प्रभावीपणे करून व गाव पातळीपर्यंत त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यावेळी ब्रिगेडियर बोधे,अ‍ॅड. जोशी यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली.

Web Title: Elimination of corruption from self: District Collector Rajendra Bhosale, District Vigilance and Publications Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.