रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटीं अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:23+5:302021-01-01T04:16:23+5:30

याबाबत पोलीस सूत्रांनुसार, रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील तत्कालीन शाखा अधिकारी हरिदास राजगुरू व कॅशियर अशोक माळी या ...

Embezzlement of Rs.5.5 crore at Ratanchand Shah Sahakari Bank's Tembhurni branch | रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटीं अपहार

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडेपाच कोटीं अपहार

googlenewsNext

याबाबत पोलीस सूत्रांनुसार, रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील तत्कालीन शाखा अधिकारी हरिदास राजगुरू व कॅशियर अशोक माळी या दोघांनी २०१६ ते २०२० या कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया, शाखा टेंभुर्णी या बँकेच्या खात्यातील असलेली तफावतीची रक्कम एक कोटी ९२ लाख २५ हजार याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील बँकेच्या खात्यातील तफावतीची रक्कम दोन कोटी ४९ लाख ९० हजार तसेच रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेतील प्रत्यक्ष उपलब्ध नसलेली हातावरील शिल्लक रकमेमधील तफावतीची रक्कम एक कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ अशा एकूण पाच कोटी ५७ लाख २ हजार ८२२ इतक्या रकमेचा अपहार केला आहे.

लवकरच गजाआड करू

या गुन्ह्याचे स्वरूप पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज) नीरज राजगुरू यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. तपासकामी दोन पोलीस पथके तयार केली आहेत. लवकरच आम्ही आरोपींना गजाआड करू, असे केंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Embezzlement of Rs.5.5 crore at Ratanchand Shah Sahakari Bank's Tembhurni branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.