कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : अकुलगाव दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:01+5:302021-05-26T04:23:01+5:30

या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, ...

Emphasize on contact tracing: District Collector's instructions during Akulgaon tour | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : अकुलगाव दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या : अकुलगाव दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Next

या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकार यांच्यासह अकुलगावच्या सरपंच जयश्री बोबडे, उपसरपंच सुनील नरुटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, गृह विलगीकरणामध्ये असलेले बरेचसे कोविड रुग्ण हे विलगीकरणाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे होम क्वारंटाईन बंद करून प्रत्येक गावात संस्थापक अलगीकरण व कोविड केअर सेंटर सुरू करावे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी भर द्यावा. अकुलगाव येथे एका दिवसात १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. आत्तापर्यंत ही संख्या ५६ वर पोहोचली असून, ४०० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावातील शाळेमध्येच आयसोलेशन सुरू करून, ११ रुग्णांना त्यात दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी जिल्हाधिकारी यांनी माढा तालुक्याचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

फोटो

अकुलगाव (ता. माढा) येथे ग्रामस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर. या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम व अधिकारी उपस्थित होते.

----

Web Title: Emphasize on contact tracing: District Collector's instructions during Akulgaon tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.