वाढत्या गर्दीच्या नियंत्रणासाठी कर्मचाऱ्यांना करावी लागतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:47+5:302021-04-27T04:22:47+5:30
१ मे पासून १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेण्यासाठी घाई ...
१ मे पासून १८ ते ४५ वर्षांपर्यंतच्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेण्यासाठी घाई केली आहे.
सोमवारी लवंग प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० जणांसाठी लस उपलब्ध झाली. लस येणार म्हणून सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच लोकांनी नंबर लावण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रावर उपलब्ध लसी इतकी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जास्तीचे लोक हताश होऊन तर शासनावर कमी लस पुरवठ्याबद्दल राग व्यक्त करीत घरी परतत होते.
यावेळी आरोग्य केंद्रातील डॉ. प्रियंका साळुंखे आणि कर्मचारी पुन्हा लवकरच लस उपलब्ध होईल, असे सांगत लोकांना शांत करत होते.
आजपर्यंत ४५ वर्षांच्या पुढील १६५० नागरिकांना लसीकरण केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष खडतरे यांनी दिली. यावेळी आसमा मुजावर आणि कल्पना शेळके या दोन परिचारिकांनी लसीकरण केले.