राज्याला तीव्र दुष्काळातून बाहेर पडण्याचे बळ दे: महसूलमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 08:07 AM2018-11-19T08:07:58+5:302018-11-19T08:09:38+5:30
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठ्ठलाला साकडे
पंढरपूर :- राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असे महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे सांगितले.
महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दिपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरु आहे. भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल.