सोलापूर मनपाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण, देगाव कोंडवाड्याची जागा, सिमेंटचे साहित्य बनविण्याचा उभारला कारखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:13 PM2017-12-20T13:13:34+5:302017-12-20T13:15:42+5:30

देगाव येथे कोंडवाडा व जिमखान्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींनी सिमेंटपासून साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. 

Encroachment at the place of Solapur Municipal Corporation, the place of Bheda Kondwada; | सोलापूर मनपाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण, देगाव कोंडवाड्याची जागा, सिमेंटचे साहित्य बनविण्याचा उभारला कारखाना

सोलापूर मनपाच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण, देगाव कोंडवाड्याची जागा, सिमेंटचे साहित्य बनविण्याचा उभारला कारखाना

googlenewsNext
ठळक मुद्देसिटी सर्व्हे क्रमांक ३३४ वर ग्रामपंचायत असल्यापासूनच कोंडवाड्याचे आरक्षण मनपाने नवीन रचनेत त्या ठिकाणी जिमखान्यासाठी आरक्षण टाकलेमनपाच्या अतिक्रमण विभाग नावाला मंगळवेढा रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचा ताबा खासगी व्यर्व्हेीने घेतला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २० : देगाव येथे कोंडवाडा व जिमखान्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून खासगी व्यक्तींनी सिमेंटपासून साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. 
देगाव येथील सिटी सर्व्हे क्रमांक ३३३, ३३४ आणि ३३५ मधील ५ गुंठे जागेची नोंद महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडे आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३३ गटमध्ये सार्वजनिक विहीर होती, पण ती बुजवून त्या ठिकाणी कारखाना उभारण्यात आला आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३४ वर ग्रामपंचायत असल्यापासूनच कोंडवाड्याचे आरक्षण आले आहे. मनपाने नवीन रचनेत त्या ठिकाणी जिमखान्यासाठी आरक्षण टाकले आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ३३५ मध्ये आड असल्याचे नमूद आहे. महापालिकेकडे या जागेची मालकी आल्यावर ताबा घेण्यात आलेला नाही. 
मंगळवेढा रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचा ताबा खासगी व्यर्व्हेीने घेतला आहे. अनेक वर्षांपासून त्या जागेत सिमेंटचे पोल, टाक्या, खिडक्या आदी साहित्य तयार करण्याचा कारखाना थाटला आहे. इतकेच नव्हे तर या जागेत पाण्याचे मोठे हौद, विनापरवाना खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. १९८८ सालापासून याच जागेत सार्वजनिक विहीर, कोंडवाडा, विहीर आणि आड असल्याची नोंद उताºयावर आहे. पण मनपाने उताºयावर नाव लावलेले नाही. 
-----------------
अतिक्रमण विभाग नावाला
- मनपाच्या अतिक्रमण विभाग नावाला आहे. अधिकाºयांच्या इंटरेस्टने कारवाई केली जाते. खासगी जागेवरील टपºया हटविण्याच्या सुपाºया घेतल्या जात आहेत. याबाबत आयुक्तांची दिशाभूल केली जाते. गरज नसताना बांधकाम नगर रचना विभागाचे अभिप्राय घेऊन हातमिळवणी करून कामे केली जात आहेत. पण सार्वजनिक हिताची लोकशाही दिनात अधिकाºयांनी आदेश देऊनही अतिक्रमणे हटविली जात नाहीत. जाणूनबुजून वादग्रस्त प्रकरणे हाताळून लोक अंगावर येतात, असे भासविले जात आहे. 
----------------
माहिती अधिकाराचा वापर
- देगाव येथील एका कार्यकर्त्याने माहिती अधिकारात या जागेबाबत भूमी व मालमत्ता विभागातून माहिती मागविल्यावर ही बाब उघड झाली. मनपाची इतकी मोक्याची जागा असताना अनेक उपक्रमांसाठी जागेचा शोध घेतला जातो. पण जागा नाही असे दाखवून प्रकल्प गुंडाळले जात आहेत. ही जागा ताब्यात घेण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

Web Title: Encroachment at the place of Solapur Municipal Corporation, the place of Bheda Kondwada;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.