पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:33 PM2019-03-08T14:33:02+5:302019-03-08T14:35:50+5:30
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर ...
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाले आहेत.
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज ५० हजारांच्या आसपास भाविक येतात. त्याचबरोबर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. यामुळे शहरासह मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यामुळे रस्ते देखील अपुरे पडतात. त्याचबरोबर मंदिर परिसरातील व्यापाºयांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली आहेत. तसेच इतर गाळेधारक देखील रस्त्यावर विविध साहित्यांची विक्री करतात. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्त्यावरुन ये-जा करताना भाविकांना अडचणी निर्माण होतात. गर्दीचा फायदा घेत अनेक चोर भाविकांच्या साहित्यांची चोरी करतात.
यामुळे श्री विठ्ठल मंदिर पोलीस चौकीचे पो.नि.विश्वास साळोखे, पो.नि. राजेश देवरे, पोसनि हर्षद गालिंदे, पोसनि परशुराम कोरके, पोउपनि पंडित जाधव, पोसफौ अण्णासाहेब वने, पासफौ जगन्नाथ कुलकर्णी, पोहेकॉ सतीश सर्वगोड, पोकॉ फिरोज मणेरी, पोकॉ वामन यलमार, पोकॉ सुनील कुलकर्णी, पोकॉ सोनाली इंगोले, पोना मनीषा भोसले व अन्य पोलीस कर्मचाºयांनी मंदिर परिसरातील व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढले. त्याचबरोबर हॉकर्सवर देखील कारवाई केली. ही कारवाई न.पा.च्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या साह्याने केली असल्याची माहिती पोसनि हर्षद गालिंदे यांनी दिली.
नियंत्रण रेषेतच असावी दुकाने
- पंढरपूर नगरपरिषदेने व पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरातील दुकानदारांना नियंत्रण रेषा टाकून दिली आहे. परंतु त्याबाहेर अनेक दुकानदार आपली दुकाने थाटतात. यामुळे रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. आता या नियंत्रण रेषेत आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़
मंदिर परिसरातील व्यापाºयांनी अतिक्रमण करु नये. त्यांनी त्यांचे व्यवसाय त्यांच्या अधिकृत जागेतच करावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- विश्वास साळोखे
पोलीस निरीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर