घोळसगावमध्ये अतिक्रमण जैसे थे; बीडीओंचा आदेश बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:35+5:302021-05-28T04:17:35+5:30

याकामी काही पदाधिकारी राजकारण करीत असल्याचा आरोप तक्रारदार भीमाशंकर फुलारी यांनी केला आहे. घोळसगाव येथे झोपडपट्टी भागात रहिवासी सुनील ...

The encroachments in Gholasgaon were like; BDs are in order | घोळसगावमध्ये अतिक्रमण जैसे थे; बीडीओंचा आदेश बासनात

घोळसगावमध्ये अतिक्रमण जैसे थे; बीडीओंचा आदेश बासनात

Next

याकामी काही पदाधिकारी राजकारण करीत असल्याचा आरोप तक्रारदार भीमाशंकर फुलारी यांनी केला आहे.

घोळसगाव येथे झोपडपट्टी भागात रहिवासी सुनील फुलारी, भीमाशंकर फुलारी यांच्यासह अनेकजण वास्तव्यास आहेत. यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवानंद मजगे, महादेव मजगे यांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड मारलेले आहे. यामुळे फुलारी यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे फुलारी यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणी दखल घेतली नव्हतीे. म्हणून त्यांनी अक्कलकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अतिक्रमणांबाबत तक्रार अर्ज दिला होता.

चौकशीअंती बीडीओंनी संबंधित अतिक्रमण तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन न करता तो बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. याबाबत मासिक बैठक बोलावून विषय चर्चेत आला असता, काही सदस्य अतिक्रमणधारकांची बाजू घेऊन कोरोनाचे कारण पुढे करत स्थगिती देण्याचा प्रयत्न करत आहेत.

ग्रा.पं.ने अतिक्रमणधारकांची बाजू घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

----

बीडीओंच्या आदेशान्वये अतिक्रमण काढण्याचा विषय सर्वसाधारण सभेत ठेवला असता, कोरोनाचे कारण पुढे करून स्थगिती दिली असली तरी, माझे मत वरिष्ठांना कळविताना अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

- व्ही. एस. घाटे, ग्रामसेवक

---

अतिक्रमण काढण्याच्या बाजूने मी आहे. मात्र, काही सदस्यांनी विरोध केल्याने विषयाला तूर्त स्थगिती दिली आहे. कोरोनाकाळ संपताच ते काढून टाकू.

- इंदुमती गायकवाड, सरपंच

----

२७अक्कलकोट-घोळसगाव

घोळसगाव येथे अतिक्रमण करून मारलेले पत्र्याचे शेड.

Web Title: The encroachments in Gholasgaon were like; BDs are in order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.