अखेर पवारांनीच घेतला आदिनाथ कारखाना, शेतकऱ्यांचा पेढे वाटून आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:19 AM2021-01-15T04:19:17+5:302021-01-15T04:19:17+5:30
उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. आदिनाथ कारखाना ...
उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. आदिनाथ कारखाना आर्थिक संकटात सापडला यास स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याची भावना कारखान्याचे ऊस उत्पादक धुळाभाऊ कोकरे यांनी व्यक्त केली. राज्य शिखर बँकेने मंगळवारी लिलावात हा कारखाना आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला २५ वर्षे कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिल्याचे समजताच ऊस उत्पादक व सभासदातून आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यातील कंदर, वांगी, चिखलठाण, केडगाव येथील शेतकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
कोट :::::::::
‘आदिनाथ’च्या परिसरात लाखो टन ऊस उपलब्ध आहे. वाहतूक खर्च कमी, परिणामी उत्पादन खर्च कमी असताना कारखान्यातील कारभाऱ्यांनी हित न पाहिल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकला नाही. कामगारांचे पगार थकले व चांगला कारखाना तोट्यात आला. बारामती अॅग्रो चालविण्याचा अनुभव असलेल्या पवारांकडून शेतकरी व कामगारांना नक्कीच न्याय मिळेल.
- चंद्रकांत सरडे,
ऊस उत्पादक चिखलठाण.
कोट ::::::::::
आदिनाथ कारखाना विश्वासने बागल गटाच्या ताब्यात दिला; पण कारखान्याच्या पारदर्शी व काटकासरीच्या अभावामुळे कारखाना आर्थिक डबघाईला आला. पवारांचा बारामती अॅग्रो तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादकांच्या उसाचे गाळप करतो व इतर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव देताे हा अनुभव आहे. आदिनाथ आता चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना फायदाच होणार आहे.
- आप्पासाहेब झांजुर्णे,
ऊस उत्पादक, रामवाडी