लॉकडाऊन संपवा मात्र जिल्हाबंदी कायम ठेवा..!
By appasaheb.patil | Published: April 8, 2020 09:55 AM2020-04-08T09:55:12+5:302020-04-08T10:01:42+5:30
सोशल मीडियावर सोलापूरकरांचे मत; दुकाने सुरू ठेवा अन् जमावबंदी कायम ठेवा...
सोलापूर : देशातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केले आहे़ या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे़ या बंदमुळे सर्वसामान्यांचे हाल होतानाचे पहावयास मिळत आहे़ शिवाय गोरगरीब जनतेला दोन वेळचं जेवण मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणखीन काही दिवस लॉकडाउन वाढण्याची शक्यता सध्या सोशल मिडियावर होत असलेल्या व्हायरल मॅसेजमुळे वर्तविण्यात येत आहे़ खरंच लॉकडाऊनची मुदत वाढवावी की कमी करावी याबाबत सोलापूरकरांच्या मनात काय आहे याबद्दल लोकमत च्या टिमने काही लोकांशी संवाद साधला़ लॉकडाऊन हटवा...जिल्हाबंदी कायम ठेवा, नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे, स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक असेल तर घराबाहेर पडा, विनाकारण एकाठिकाणी गर्दी करू नको, शासनाच्या नियमांचे पालन करा असा एक नाही अनेक प्रकारची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
लॉकडाउनमुळे माझ्या दुकानात अनेकांचे मोबाईल दुरूस्ती होऊन पडलेले आहेत़ ग्राहकांचे वारंवार फोन येत आहेत़ आमचा मोबाईल द्या, आम्हाला गरज आहे़़़पण लॉकडाऊनमुळे दुकान उघडता येईना त्यामुळे शेकडो ग्राहकांचे मोबाईल तसेच पडून आहेत़ शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, कडक उपाययोजनाव्दारे कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत़ विनाकारण घराबाहेर न पडता नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, कोरोनामुक्तीसाठी पुढाकार घ्यावा़
- स्वप्नील जाधव,
मोबाईल विक्रेता, सोलापूर
आमचा इस्त्रीचा व्यवसाय आहे़ आम्ही नवरा-बायको दोघेही इस्त्री मारण्याचे काम करतो़ मात्र लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय मागील दहा ते बारा दिवसांपासून बंद आहे़ आमच्या घरात आर्थिक अडचण सुरू आहे़ ज्यांचे कपडे तयार आहेत तेही दुकान बंद असल्यामुळे देता येत नाहीत. होय सरकार आमच्या चांगल्यासाठीच निर्णय घेत आहे पण त्यातही थोडया प्रमाणात सुट द्यावी, लॉकडाऊन हटवावे, गोरगरीबांना जगण्यासाठी मदत करावी़
- सागर राऊत,
लॉड्री व्यावसायिक, सोलापूर
देशात लॉकडाऊन स्थितीमुळे कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होत आहे़ इतर देशापेक्षा भारतात रूग्णांची संख्या कमी आहे़ शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचे खरेच कौतुक करायला हवे़ पण लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल होऊन बसले आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना काम मिळेल, पैसा मिळेल अन त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील़ सर्वच काही बंद असल्यामुळे माणूस घरात बसून बसून वेडा होऊ लागला आहे़ लॉकडाऊन काढल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल़
- सुशीला कुंभार,
सर्वसामान्य नागरिक, सोलापूर
या लॉकडाऊन निर्णयामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे़ हाताला काम नाही, खायला अन्न नाही काय करायचं़ कोरोनाने मरण्यापेक्षा अन्नपाण्याविना लोक मरतील. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत़ नागरिकांनीही शासनाच्या प्रत्येक उपाययोजनांचा साथ द्यायला हवी मात्र शासनाने लॉकडाऊन उघडल्यास सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुंदर होईल़ त्वरीत लॉकडाऊन मागे घ्यावे, आणखीन काही दिवस वाढवू नये़
- अर्चना जाधव
नागरिक, सोलापूर
मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर १४ तारखेपर्यंत असणारे लॉकडाऊन जुनपर्यंत असणार आहे असे मॅसेज व्हायरल होत आहेत़ त्यामुळे काहीच कळतं नाही की ते लॉकडाऊन कधी संपणार आहे की वाढणाऱ शासनाने देशातील कोरोनाची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवावे़ जेणेकरून संसर्ग होऊन रूग्णांची संख्या वाढणार नाही़ नागरिकांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी घराबाहेर पडणं टाळावे, स्वच्छता राखावी, सोशल मिडियावर फिरणाºया संदेशावर विश्वास ठेऊ नका़
- अमोल शहा,
महाविद्यालयीन विद्यार्थी, सोलापूर