फेरीअखेर कमी-जास्त हाेणारे मताधिक्य अन् वाढणारी उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:35+5:302021-05-03T04:17:35+5:30
त्यानंतर हक्काच्या गादेगाव, कोर्टी या दोन मोठ्या गावांचा समावेश असलेल्या तिसऱ्या फेरीत समाधान आवताडे यांना २४८६ तर भगीरथ भालके ...
त्यानंतर हक्काच्या गादेगाव, कोर्टी या दोन मोठ्या गावांचा समावेश असलेल्या तिसऱ्या फेरीत समाधान आवताडे यांना २४८६ तर भगीरथ भालके यांना ३००७ मते मिळाली. त्यामुळे भगीरथ भालके यांनी दुसऱ्या फेरीअखेर मिळविलेली आघाडी पुढे वाढवत ६३५ वर नेऊन ठेवली. चौथ्या फेरीत कोर्टीचा काही भाग, बोहाळी, उंबरगाव, टाकळी या गावांचा समावेश होता. या गावांमधून समाधान आवताडेंना ३३२५ तर भगीरथ भालके यांना ३३२८ मते मिळाली. त्यामुळे या फेरीतील तीन मतांची माफक आघाडी घेत भालकेंनी आपली आघाडी ६३८ वर पोहोचविली. त्यानंतर टाकळी व पंढरपूरचा काही भाग असलेल्या पाचव्या फेरीत समाधान आवताडेंना २७५६ तर भगीरथ भालकेंना २७७६ मते मिळाली. याही फेरीत भगीरथ भालकेंना २० मतांची अल्पशी आघाडी मिळाल्याने त्यांची आघाडी ६५८ वर जाऊन पोहोचली.
सहाव्या फेरीत पंढरपूर शहर सुरू झाले. या फेरीत समाधान आवताडेंना ३१५९ तर भगीरथ भालकेंना २६९५ मते मिळाली. त्यामुळे मागील फेरीतील ६५८ मतांची आघाडी या ठिकाणी कमी होऊन भगीरथ भालके यांना अवघ्या १९४ मतांची आघाडी राहिली. सातव्या फेरीअखेर पंढरपुरातीलच मतदान केंद्रांवर समाधान आवताडे यांना २९९५ तर भगीरथ भालके यांना १९६८ मते मिळाली. त्यामुळे सहाव्या फेरीतील भगीरथ भालकेंची १९४ मतांची आघाडी कमी होऊन सातव्या फेरीअखेर समाधान आवताडे पुन्हा ८३३ मतांनी पुढे गेले.
आठव्या फेरीअखेर पंढरपुरातीलच मतदान केंद्रावर समाधान आवताडेंना पुन्हा ३२८७ तर भगीरथ भालकेंना १९५४ मते मिळाली. त्यामुळे समाधान आवताडेंची ८३३ मतांची आघाडी तब्बल २१६६ मतांवर पोहोचली. नवव्या फेरीअखेर पंढरपुरातच समाधान आवताडेंना २७५५ तर भगीरथ भालकेंना २६९३ मते मिळाली. या फेरीत ६२ मतांनी समाधान आवताडेंचे मताधिक्य पुन्हा वाढून २२२८ वर पोहोचले. पंढरपुरातीलच मतदान केंद्रावर दहाव्या फेरीअखेर आवताडेंना २५२१ तर भालकेंना ३१०६ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे २२२८ चे मताधिक्य कमी होऊन १६६३ वर आले. अकराव्या फेरीअखेर पुन्हा पंढरपुरातील मतदान केंद्रावर आवताडेंना २१९१ तर भालकेंना २५३४ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे मताधिक्य पुन्हा ३३५ ने कमी होत १३०८ वर येऊन पोहोचले. पंढरपुरातील मतदान केंद्रावर बाराव्या फेरीअखेर आवताडे २२५४ तर भालके २३४८ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंची पुन्हा ९४ मतांनी मताधिक्य घटत १२१४ वर पोहोचले. त्यानंतर पंढरपुरातील शेवटचा काही भाग मुंढेवाडीचा समावेश असलेल्या तेराव्या फेरीत आवताडेंना २६६४ तर भालकेंना २८१९ मते मिळाली. या फेरीत पुन्हा समाधान आवताडेंचे मताधिक्य १५५ ने घटून १०५९ वर येऊन थांबले. त्यानंतर मुंढेवाडीचा काही भाग, गोपाळपूर, कासेगाव आदी गावांचा समावेश असलेल्या चौदाव्या फेरीत आवताडेंना २९६२ तर भालकेंना ३००८ मते मिळाली. या फेरीत आवताडेंचे मताधिक्य ४६ ने पुन्हा कमी झाले व १०१३ वर येऊन थांबले.
कासेगावचा काही भाग व परिचारकांचे गाव असलेल्या खर्डी या गावांचा समावेश असलेल्या १५व्या फेरीत आवताडेंना ३०७८ तर भालकेंना ३७१५ मते मिळाली. त्यामुळे या फेरीत आवताडेंचे मताधिक्य पुन्हा ६३७ मतांनी कमी झाले व ते अवघ्या ३७६ मतांवर येऊन ठेपले. सोळाव्या फेरीत खर्डी, तपकिरी शेटफळ, तनाळी, तावशी आदी गावांचा समावेश होता. या गावात मात्र समाधान आवताडे यांनी पुन्हा अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. आवताडेंना ४००१ तर भालकेंना ३१५० मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे घटलेले मताधिक्य या फेरीत ८५१ ने पुन्हा वाढून १२२७ वर पोहोचले. तावशीचा काही भाग, चिचुंबे, सिद्धेवाडी, एकलासपूर, अनवली या गावांचा समावेश असलेल्या सतराव्या फेरीत समाधान आवताडेंना ३१८८ तर भालकेंना ३६६० मते मिळाली. त्यामुळे या ठिकाणी आवताडेंचे मताधिक्य पुन्हा ४७२ ने कमी होऊन ७५५ वर येऊन ठेपले. अनवली, रांझणी, शिरगाव, तरटगाव, महमदाबाद (शे), गुंजेगाव, मारापूर आदी गावांचा समावेश असलेल्या १८व्या फेरीत आवताडेंना ३३२८ व भालकेंना ३०१७ मते मिळाली. यामध्ये आवताडेंचे मताधिक्य पुन्हा ३११ मतांनी वाढून १०६६ वर जाऊन पोहोचले.
१९ व्या फेरीत मारापूर, घरनिकी, देगाव, मल्लेवाडी, ढवळस, धर्मगाव, मुढवी, उचेठाण, बठाण आदी नाऊ गावांचा समावेश होता. या फेरीत आवताडेंना ३१०९ तर भालकेंना ३२८० मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे मताधिक्य १७१ ने कमी होऊन पुन्हा ८९५ वर येऊन पोहोचले. बठाण, ब्रह्मपुरी, मंगळवेढा शहर या गावांचा समावेश असलेल्या २०व्या फेरीत आवताडेंना ३२२८ व भालकेंना २३८२ मते मिळाली. त्यामुळे या फेरीत समाधान आवताडेंनी ८४६ मतांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत ती १७४१ वर पोहोचविली. २१व्या फेरीत मंगळवेढा शहरातील मतदान केंद्रावर आवताडेंना ३२६९ तर भालकेंना केवळ १७६३ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे मताधिक्य पुन्हा एकदम १५०६ मतांनी वाढत ३२४७ वर जाऊन पोहोचले.
२२ व्या फेरीत मंगळवेढा शहरातील मतदान केंद्रावरच आवताडेंना २७५४ व भालकेंना २०५५ मते मिळाली. या फेरीतही आवताडेंनी ६९९ मतांची अल्पशी आघाडी घेत आपली एकूण आघाडी ३९४६ वर नेऊन पोहोचविली. २३ व्या फेरीत मंगळवेढा शहरातील काही भाग, अकोले, शेलेवाडी यांचा समावेश होता. या फेरीत आवताडेंना तब्बल ३७९२ मते मिळाली. तर भालकेंना २११० मते मिळाली. त्यामुळे आवताडे यांनी या फेरीत जोरदार मुसंडी मारत १६८२ मतांची आघाडी घेतल्याने त्यांची आघाडी ५८२८ वर जाऊन पोहोचली.
लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव या दोन गावांचा समावेश असलेल्या २४ व्या फेरीत आवताडेंना २९८२ व भालकेंना २५५४ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे मताधिक्य ४२८ ने वाढून तब्बल ६०५६ झाले होते. २५व्या फेरीतील कचरेवाडी, मुंढेवाडी, माचणूर, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर आदी सहा गावांचा समावेश असलेल्या फेरीत आवताडेंना ३४८९ तर भालकेंना ३२११ मते मिळाली. या फेरीतही आवताडेंना २७८चे मताधिक्य मिळत एकूण मताधिक्य ६३३४ वर जाऊन पोहोचले. रहाटेवाडी, बोराळे, अरळी, नंदूर या गावांचा समावेश असलेल्या २६व्या फेरीत आवताडे २३६५ तर भालके २३८२ मते मिळाली. त्यामुळे या फेरीत आवताडेंचे मताधिक्य १७ने कमी होऊन ६३१७ वर आले. २७ व्या फेरीत नंदूर, डोणज, भालेवाडी, फटेवाडी, खोमनाळ या गावातून आवताडेंना ३११९ तर भालकेंना २८०४ मते मिळाल्यामुळे आवताडे पुन्हा ३१५ मतांनी पुढे जात मताधिक्य ६६३२ वर गेले. २८व्या फेरीत हिवरगाव, डोंगरगाव, पाटखळ, गणेशवाडी, लेंडवेचिंचाळे या गावांमुळे आवताडेंना ३२२२ तर भालकेंना २७९१ मते मिळाल्याने आवताडेंचे मताधिक्य पुन्हा ४३१ने वाढत ७०६३वर जाऊन पोहोचले. २९व्या फेरीत लेंडवेचिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जुनोनी, मेटकरवाडी या गावांमधून आवताडेंना २४२६ तर भालकेंना ३३१७ मते मिळाली. या फेरीत आवताडेंचे मताधिक्य ८९१ ने कमी होऊन ६१७२ वर आले.
३०व्या फेरीत हाजापूर, भाळवणी, तळसंगी, मरवडे या गावांमध्ये आवताडेंना २८३२ तर भालकेंना ३०९४ मते मिळाली. त्यामुळे आवताडेंचे मताधिक्य २६२ने कमी होत ५९१० वर येऊन पोहोचले. ३१व्या फेरीत मरवडे, लमाणतांडा, डिकसळ, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ, हुलजंती या गावांमधून आवताडेंना २४०० तर भालकेंना २३५२ मते मिळाली. या फेरीत आवताडेंचे पुन्हा ४८ने मताधिक्य वाढत ५९५८ वर जाऊन पोहोचले. ३२व्या फेरीत हुलजंती, मल्लेवाडी, येड्राव, खवे, जित्ती, निंबोणी आदी गावांमधून आवताडेंना २५५७ तर भालकेंना २८७४ मते मिळाली. या फेरीत आवताडेंची ३१७ मतांची घसरण होऊन मताधिक्य ५६४१ वर आले. ३३व्या फेरीत निंबोणी, जालिहाळ, खडकी, नंदेश्वर या गावांमध्ये आवताडेंना २५८० तर भालकेंना ३२७६ मते मिळाली. त्यामुळे या ठिकाणीही आवताडेंचे ६९६ मतांचे मताधिक्य घटून ४९४५वर राहिले. ३४व्या फेरीत भोसे, रड्डे या गावातून आवताडेंना १८६१ व भालकेंना २६७० मते मिळाली. आवताडेंचे पुन्हा ८०९ मतांनी मताधिक्य घटून ४१३६ वर आले. त्यानंतर ३५व्या फेरीत चिक्कलगी, बावची, पौट, येळगी, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, सलगर खु आदी गावांमधून आवताडेंना ३१७२ व भालकेंना २९१३ मते मिळाली.. यामध्ये आवताडे २५९ मतांची आघाडी घेत ४३९५ वर पोहोचले. तर ३६व्या फेरीत सलगर खु., जंगलगी, सलगर बु, लवंगी, मारोळी आदी गावांतून आवताडेंना २६७८ तर भालकेंना २९७१ मते मिळाली. यामध्ये आवताडेंचे २९३ ने घटून ४१०२ आले. ३७व्या फेरीत शिरनांदगी, हुन्नूर, मानेवाडी, रेवेवाडी, महमदाबाद (हु) या गावांमध्ये आवताडेंना २६३३ तर भालकेंना ३०३१ मते मिळाली. यामध्येही आवताडेंचे ३९८ मताधिक्य घटून ३७०४ वर आले. तर ३८व्या शेवटच्या फेरीतील लोणार, पडोळकरवाडी या गावांमध्ये आवताडेंना ८५६ व भालकेंना १०५७ मते मिळाली. यामध्येही आवताडेंचे २०१ने मताधिक्य घटून ३५०३वर आले. त्यानंतर पोस्टल मतांमधील ३३३१पैकी आवताडेंना १६७६ तर भालकेंना १४७६ मते मिळाली. यामध्येही समाधान आवताडेंनी २३० मतांची आघाडी घेतली. त्यामुळे कौंटिंग मशीनवरील ३५०३ वर पोस्टल मतांमधील २३० अशी एकूण ३७३३ मतांची आघाडी घेऊन समाधान आवताडे विजयी झाले.
प्रत्येक फेरीत मताधिक्यात चढउतार
या पोटनिवडणुकीत मतमोजणीदरम्यान अगदी पहिल्या फेरीपासून ३८व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीत समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यात जोरदार टक्कर पाहावयास मिळाली. प्रत्येक फेरीत दोघांचेही मताधिक्य २०० ते १००० मतांदरम्यान कमीजास्त होत असल्याने शेवटपर्यंत कोण निवडून येईल, हे खात्रीशीर कोणीही सांगत नव्हते. याला उमेदवारही अपवाद नव्हते. त्यामुळेच शेवटपर्यंत मतदान केंद्रावर दोन्ही उमेदवार आले नव्हते. मात्र ३५व्या फेरीअखेर विजयाची खात्री झाल्यानंतरच समाधान आवताडेंनी मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली अन् त्यांच्या अंदाजाप्रमाणे ते विजयी झाले.