‘तरूण भारत श्री’ स्पर्धेला अखेर मुहूर्त

By admin | Published: January 2, 2015 10:51 PM2015-01-02T22:51:31+5:302015-01-03T00:14:57+5:30

पुन्हा प्रारंभ: सात जानेवारीला आयोजनर्

At the end of the 'Tarun Bharat Shree' competition, | ‘तरूण भारत श्री’ स्पर्धेला अखेर मुहूर्त

‘तरूण भारत श्री’ स्पर्धेला अखेर मुहूर्त

Next


आदित्यराज घोरपडेल्ल सांगली
राज्यभर नावारूपास आलेल्या ‘तरूण भारत श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेस तब्बल आठ वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे़ ७ जानेवारी २०१५ या तारखेवर शिक्कामोर्तब झाले असून, याबाबत संचालक मंडळाची सभाही झाली आहे़ तेरावी तरूण भारत श्री स्पर्धा धुमडाक्यात पार पाडण्यासाठी जोरदार ‘फिल्डींग’ लावण्यात आली आहे़
गेल्या आठ वर्षापासून विविध कारणांमुळे ही शरीरसौष्ठव स्पर्धा बंद पडली होती़ दोन वर्षांपूर्वी मंडळाची निवडणूक झाली़ वर्षानुवर्षाच्या सत्तेला खिंडार पडले़ मंडळात सत्तांतर झाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेवून सांगलीला कबड्डीमय केले़ ‘कहो दिलसे़़क़बड्डी फिरसे’चा नारा राज्यभर घुमला़
माजी मंत्री मदन पाटील यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष घातलं होतं़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बंद पडलेली ‘तरूण भारत श्री’ स्पर्धा सुरू करणार असल्याचं, मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष शंकरराव दुदुस्कर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं़ त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते़ मात्र दुर्देवाने त्यांचे निधन झाले़
प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘तरूण भारत श्री’ ही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व्हायची़ ११ वर्षापासून अखंडीतपणे स्पर्धा सुरू होती. मात्र २००६ मध्ये ही स्पर्धा बंद पडली़ राज्यभरातून या स्पर्धेसाठी मातब्बर शरीरसौष्ठवपटू दाखल व्हायचे़ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याचा पहीला रविवार म्हणजे ‘तरूण भारत श्री स्पर्धा’ हे समिकरण राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सर्वांना तोंडपाठ झालेलं़ १९९४ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती़
अनिल राऊत, मंदार चवरकर व सुहास खामकर यांनी दोन वेळा तरूण भारत श्री किताब मिळवण्याचा करिष्मा केला होता़

का बंद पडली स्पर्धा?
महाराष्ट्रात सध्या दोन राज्य शरीरसौष्ठव संघटनाआहेत. त्यामुळे स्पर्धा कोणत्या संघटनेच्या मान्यतेने घ्याव्यात हा प्रश्न संयोजकांना पडतो. म्हणूनच गेल्या आठ वर्षांपासून या स्पर्धा बंद आहेत. संजय मोरे (औरंगाबाद) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मधुकर तळवळकर (मुंबई) यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू आहे़

‘तरूण भारत श्री’ विजेते़
१९९४ : प्रकाश कोयंडे (मुंबई)
१९९५ : रवींद्र आरते (सांगली)
१९९६ : श्रीकांत बंगेरा (मुंबई )
१९९७ : अनिल राऊत (मुंबई)
१९९८ : अनिल राऊत (मुंबई)
१९९९ : श्याम रहाटे (मुंबई)
२००० : संदीप वालावलकर (मुंबई)
२००१ : मंदार चवरकर (मुंबई)
२००२ : प्रकाश घाडगे (मुंबई)
२००३ : एम़ एस़ मोहनन (सेनादल)
२००४ : मंदार चवरकर (मुंबई)
२००५ : सुहास खामकर (कोल्हापूर)
२००६ : सुहास खामकर (कोल्हापूर)

Web Title: At the end of the 'Tarun Bharat Shree' competition,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.