शत्रूबी व्हतोय दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:08 PM2019-10-05T13:08:04+5:302019-10-05T13:09:00+5:30

विधानसभा निवडणूक; राजकीय टोलेबाजी

Enemy looking friends! | शत्रूबी व्हतोय दोस्त !

शत्रूबी व्हतोय दोस्त !

Next

विलास जळकोटकर

राम राम मंडळी... आपल्या मºहाठी भाषेत एक म्हणय. ‘उचलली जीभ लावली टाळंला’ असंच काहीसं आपल्या जिल्ह्यात घडू लागलंय.एकतर आचारसंहिता लागू व्हायच्या पूर्वीपासून नुसता घोळ, घोळ अन् घोळ सुरुय. काल उमेदवारी दाखल करण्यापर्यंत हा गोंधळ सुरुच आहे. इलेक्शनचा घमसान आता वाढू लागलाय पारावरच्या कट्ट्यावर..., चहाच्या कँटीनवर... पानटपरी अन् सलूनमध्ये आता निवडणुकीच्या गप्पांत रंंग भरू लागलाय.  निवडणुकीच्या निमित्ताने अनेक किस्से, गमती-जमती घडू लागल्या आहेत.
चला तर बघू काय चाललंय ...

अण्णा: राम राम तात्या... काय म्हनतंय इलेक्शन.
तात्या:  अरं कशाचं काय समदीकडं धुसफूस चाललीय. कोनबी कुनाचा ऐकंना झालंय बग.
अण्णा: अरं असंच असनार. समद्यालाच आता खुर्चीचं डव्हाळ लागलंय. 
तात्या:  अरं पन एवढ्या खुर्च्या आनायच्या कुठून
(मध्येच नामू माळी म्हनतो कसा)
नामू :  काय बी म्हना तात्या, औंदा समद्याच पुढाºयाची पंचायत झाली बग. तिकडं त्या भगवंताच्या बार्शीत ‘तू बडा मै बडा’ म्हणत कोणबी मागं हटलं नाह्य. जोरात घमशान हाय बग. मज्जाय बाबा तितं.
तात्या:  त्ये खरं हाय रं, पन करमाळ्याच्या सैराट नगरात बी काय कमी घोळ नाह्य. भगवा घिऊन दिदीनं बाजी मारल्याय तर मामा आन् पैलवानांनी बी शड्डू ठोकलाय लेका. लई जोरात तिरंगी कुस्ती व्हनाराय म्हणत्यात तिकडं.
अण्णा : ये वेड्या, तिरंगी नव्हं चौरंगी कुस्ती व्हनारं. 
(मध्येच तोंड खुपसत खालच्या आळीचा महादू पचकला)
महादू: चवथा कोण वं अण्णा. 
अण्णा: आरं पल्लेदार मिशीवालं जयवंतराव
तात्या/महादू: (एकाचवेळी) आरं तिच्या विसरलाव की.
अण्णा: आरं तितलं राजकारनच येगळं हा बाबानू.
तात्या: ये अण्णा तितलंच काय समदीकडं असंच असतंय. 
अण्णा: मर्दानू औंदाचं राजकारन येगळं झालय बग. कोन कुनावर मात करल आन् कोण चित व्हईल हे सांगणं कठीन हाय बग.
तात्या: आता ह्येच बग की, गेल्या येळंला डोक्यावरच्या पांढºया टोप्या आन् उपरणं औंदा बदललंय का नाह्य.
अण्णा: अरं मर्दानू मी त्येच सांगतूय. सारा पैशाचा आन् खुर्चीचा  खेळ हाय. तुमची-आमची कुनाला काय पडली नाह्य बगा.
तात्या: त्यला जबाबदार बी आपुनच हाव. 
अण्णा: जाऊ द्या रं. समदे एकच असत्यात. आपल्याला येडं करत्यात. आता बग की, कालपतोर गळ्यात गळा घालून फिरणारी अण्णा, तात्या, नाना, आप्पा ही मंडळीची तोंडं तिकीट नाही मिळाली की कशी गरकन फिरल्याती. ज्यचं कधी जमलं ती बी सेल्फी दिऊन खोटं खोटं हसा लागल्याती. त्ये खरं हाय बाबा. राजकारनात कालचा शत्रू आजचा दोस्तबी व्हतो. जाऊ द्या आपल्याला काय करायचय. 
महादू (आळस देत) लई कट्टाळा आलाय बाबा. चला आता फक्कड चहा मारू म्हणतच कँटीनकडे वळतात....)

Web Title: Enemy looking friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.