आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी तत्त्वज्ञान हेच आध्यात्मिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 03:53 PM2020-08-13T15:53:47+5:302020-08-13T15:54:24+5:30

'आद्य' म्हणजे आधीचा व 'आत्मन’ म्हणजे आत्मा...

Engaged in Bhagavad-gita contemplation, the result of true hearing ...! | आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी तत्त्वज्ञान हेच आध्यात्मिक

आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी तत्त्वज्ञान हेच आध्यात्मिक

googlenewsNext

अध्यात्म या संबोधात आद्य+आत्मन अशी दोन पदे आलेली दिसतात. यातील 'आद्य' म्हणजे आधीचा व 'आत्मन’ म्हणजे आत्मा. याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की 'आत्म्याच्या आधीचे' आणि आपल्याकडे आत्म्याची जी संकल्पना प्रस्थापित झालेली आहे, ती बरीच अवार्चीन आहे. म्हणजेच आत्म्याच्या संकल्पनेपूर्वी जे तत्त्वज्ञान अस्तित्वात होते, ते म्हणजे 'अध्यात्म' होय. आणि या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे स्वरूप हे पूर्णत: इहवादी, ऐंद्रियसंलग्न, अनुभवनिष्ठ, वास्ततवादी, जन्म ते मृत्यूच्या दरम्यानचेच होते. जन्मापूर्वी व मृत्यूपत्रात असे या आध्यात्मिक तत्त्वज्ञानात काही नव्हते. असे इहवादी तत्त्वज्ञान म्हणजे 'अध्यात्म' होय असे दिसते. 

या पृथ्वीवर परंपरेतील अशा इहवादी वास्तवदर्शी तत्त्वज्ञानाचा शोध घेतला आणि ऐंद्रियनिष्ठ अध्यात्मवाद समजावून घेतला, त्यांचे सगुण-निर्गुणत्व समजता आले तेव्हा कुठे करंदीकरांच्या अध्यात्म जाणिवेचा थोडाफार विचार करता आला, काही अंशी का होईना करंदीकरांच्या अध्यात्म जाणिवेच्या जवळपास पोहोचता आले असे वाटते.

परंपरेत धर्माची व्याख्या 'धारयति इति धर्म:' म्हणजे, 'जो धारण केला जातो तो धर्म' इतकी सुटसुटीत व सोपी आहे. या व्याख्येनुसार मी दैनंदिन जीवनात मित्र, नवरा, बाप, शिक्षक अशा कितीतरी भूमिका क्षणाक्षणाला बदलत असतो. त्या त्या भूमिकेत असताना मी त्या भूमिकेची म्हणून जी कर्तव्ये आहेत, ती पार पाडत असेल तर मी त्या त्या धारण केलेल्या धमार्चे पालनच करीत असतो. अशाप्रकारे दिवसभरात क्षणाक्षणाला बदलणा?्या व धारण केलेल्या धर्माचरणाला कर्मकाण्डांची गरज नाही हे स्पष्टच आहे. धर्म आणि कर्मकाण्डांमधील हा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. यातील धर्म संकल्पना स्वीकारार्ह असली तरी, कर्मकाण्डाची या धमार्लाही गरज दिसत नाही. यावरून असे म्हणता येईल की 'इहलोकी दैनंदिन भौतिक जीवन जगताना नीतिमान होऊन परस्परांशी वागण्याचे नियम म्हणजे 'धर्म' तर इहलोकी भौतिक जीवन जगताना अलौकिक व दिव्यशक्तीचा मानसिक आधार प्राप्त करण्याचा जो सांकेतिक मार्ग आहे ते 'कर्मकाण्ड' होय. 
- सुधाकर जांभळे महाराज,
सोलापूर

Web Title: Engaged in Bhagavad-gita contemplation, the result of true hearing ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.