हन्नूरमध्ये वैरत्व संपले... भरमशेट्टी, कल्याणशेट्टी आले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:25+5:302021-01-25T04:22:25+5:30
प्राप्त केले. या निवडणुकीत सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला. निवडणूक लागण्यापूर्वी ही निवडणूक दोघांकडून बिनविरोध ...
प्राप्त केले. या निवडणुकीत सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला.
निवडणूक लागण्यापूर्वी ही निवडणूक दोघांकडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु काही जणांनी ही निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला. तरीही ज्येष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी, सागर कल्याणशेट्टी, विश्वनाथ भरमशेट्टी व राजकुमार भरमशेट्टी यांनी एकत्र येत
पॅनल उभा करून गावावर वर्चस्व प्राप्त
केले. चार जागा यापूर्वीच दोन्ही गटांच्या बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सात जागांसाठी निवडणूक लागली होती.
यामध्येही कल्याणशेट्टी आणि
भरमशेट्टी गटाचे उमेदवार विजयी झाले.
प्रभाग १ मध्ये सोपान निकते, प्रभाग २ मध्ये शैलेश पाटील, सोनाबाई तळवार, प्रभाग ४ मध्ये सागर कल्याणशेट्टी
हे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये श्रीकांत बकरे, प्रभाग २ मध्ये गौराबाई भरमशेट्टी, प्रभाग ३ मध्ये गौतम बाळशंकर, प्रभाग ३ मध्येच नीता सोनकांबळे, प्रभात ४ मध्ये काशप्पा पुजारी विजयी झाले.
विरोधी चंद्रमणी बाळशंकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला एकही
जागा जिंकता आली नाही. दोन्ही गट आता एकत्र आल्याने गावच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ============================