पुढील परिणामास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:12+5:302021-07-05T04:15:12+5:30

अकलूज-माळेवाडीचे नगरपरिषद व नातेपुतेचे नगरपंचायतीत रुपांतर करावे, या मागणीसाठी तीनही गावच्या नागरिकांतर्फे २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज ...

The entire state government will be responsible for further consequences | पुढील परिणामास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील

पुढील परिणामास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील

Next

अकलूज-माळेवाडीचे नगरपरिषद व नातेपुतेचे नगरपंचायतीत रुपांतर करावे, या मागणीसाठी तीनही गावच्या नागरिकांतर्फे २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तेरावा दिवस उजाडला तरी शासन आंदोलनाची दखल घेत नसल्याची खंत व्यक्त करताना शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली.

याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, झेडपी सदस्या सुनंदा फुले, पं.स. सदस्या हेमलता चांडोले, हसीना शेख, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, माजी पं.स. सदस्या फातिमा पाटावाला, ग्रा.पं. सदस्या रेश्मा गायकवाड, रेश्मा तांबोळी, नीता शिवरकर, ज्योती फुले, वैष्णवी दोरकर, सीमा एकतपुरे, श्रध्दा जवंजाळ, लीना जामदार, उज्ज्वला जामदार, मनीषा ढवळे, वैशाली पोरे, लिना मुळे, संजय साठे, कासिम तांबोळी, उत्कर्ष शेटे आदी उपस्थित होते.

...तरी सरकारला जाग येत नाही

अकलूज, माळेवाडी, नातेपुते गावची पुरुष मंडळी सरकार विरोधात प्रचंड आक्रमक झाली आहेत. असे असताना महिलांनी त्यांना थोपवून ठेवले आहे. आता महिलांचा संयम सुटत चालला आहे. उपोषणकर्त्यांकडून सरकारचा दहावा घालून आज तेरावा घातला आहे. तरी सरकारला जाग येत नाही. आता हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला.

आज यांनी दिला पाठिंबा

आज नीराई मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, दयावान प्रतिष्ठान, शिवधैर्य फाउंडेशन, अकलूज मशिनरी स्टोअर्स असोसिएशन, संत शिरोमणी नामदेव महाराज युवक व महिला संघटना, हिंदू खाटीक युवक संघटना, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, शिवगर्जना अकलूज या संघटनांतर्फे उपोषणास पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिंपी समाजाचे पप्पू चंडोले यांनी मनोगत व्यक्त केले.

040721\img-20210704-wa0017.jpg

साखळी उपोषणास समस्त नामदेव शिंपी समाजाच्यावतीने पाठिंब्याचे पत्र देताना समाजबांधव व भगिनी

Web Title: The entire state government will be responsible for further consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.