सोलापुरात तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:31 AM2019-04-17T04:31:46+5:302019-04-19T14:57:31+5:30
सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.
सोलापूर राखीव मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अत्यंत चुरशीचा असा तिरंगी सामना होत आहे.
>मोदी माहात्म्याचे पारायण
जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य, सर्जिकल स्ट्राइक, रस्त्यांचा विकास, भविष्यातील सिंचन योजना, शेतकरी व मजुरांना पेन्शन यावर जोर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक विमानतळ, रेल्वेचे जाळे या प्रश्नांवर प्रचारात भर दिला. भाजपची सारी भिस्त मतविभागणीवर अवलंबून असल्याने सोशल इंजिनीअरिंग करण्याचा प्रयत्न केला.
राफेल घोटाळा आणि ‘न्याय’
सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ अनुभवी नेते असल्याने त्यांनी राष्टÑीय प्रश्नांवर प्रचारात दिला. नोटाबंदी, जीएसटीमुळे झालेली देशाची आर्थिक हानी, बेरोजगारी आणि राफेल विमान घोटाळा, यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला, तसेच काँग्रेसने जाहीर केलेली गरिबांसाठीची न्याय योजना समजावून सांगितली.
>संविधान बचाव अन् सामाजिक ऐक्य
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे या लढतीत खऱ्या अर्थाने चुरस आली. आंबेडकरांनी रा.स्व. संघ आणि भाजपच्या संकुचित धोरणांमुळे संविधान कसे धोक्यात आले आहे, यावर भर दिला, तसेच ही लढाई राजकीय नसून सामाजिक ऐक्यासाठीचा लढा असल्याचे वारंवार सांगितले. वेगळ्या मुद्द्यांमुळे त्यांच्या सभांना गर्दी दिसून आली.
>हेही उमेदवार रिंगणात
लोकसभा निवडणुकीत 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. वरील तीन प्रमुख उमेदवारांबरोबरच अर्जुन ओहळ, कृष्णा भिसे, विष्णू गायधनकर, व्यंकटेश स्वामी, अशोक उघडे, सुदर्शन खंदारे, अॅड. मनीषा कारंडे, मल्हारी पाटोळे, अॅड. विक्रम कसबे, श्रीमंत मस्के या उमेदवारांचा समावेश आहे. यातील सहा उमेदवार अपक्ष आहेत. सन २0१४ मध्ये १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात ११ अपक्ष उमेदवार होते, तसेच सन २00९ मध्ये १३ जण निवडणूक रिंगणात होते त्यात अपक्ष ७ होते.