प्रलंबित उद्योगांसंदर्भात बार्शीतील उद्योजक भेटले उद्योगमंत्र्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:27 AM2021-08-18T04:27:49+5:302021-08-18T04:27:49+5:30

बार्शी : प्रलंबित एम.आय.डी.सी. निर्माणाला व बार्शीच्या उद्योगविश्वाला गती, चालना देण्यासाठी, नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत ...

Entrepreneurs from Barshi met the Industry Minister regarding pending industries | प्रलंबित उद्योगांसंदर्भात बार्शीतील उद्योजक भेटले उद्योगमंत्र्यांना

प्रलंबित उद्योगांसंदर्भात बार्शीतील उद्योजक भेटले उद्योगमंत्र्यांना

Next

बार्शी : प्रलंबित एम.आय.डी.सी. निर्माणाला व बार्शीच्या उद्योगविश्वाला गती, चालना देण्यासाठी, नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे केंद्र सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आमदार राऊत यांनी बार्शीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. बार्शी एम.आय.डी.सी. निर्माणाला मदत करण्याची ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.

त्याचबरोबर बार्शीत नवीन उद्योगनिर्मितीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत, सबसिडी, सवलती देऊन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत व उद्योजकांच्या शिष्टमंडळास दिली.

बार्शीत नवीन उद्योगनिर्मितीचे प्रस्ताव उद्योजकांनी केंद्रीय उद्योग, खाते व अन्न उद्योग प्रक्रिया खात्याकडे सादर करावेत. या नवीन उद्योगांमुळे नवीन रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मत नारायण राणे यांनी बार्शीच्या उद्योजक शिष्टमंडळ भेटीत व्यक्त केले. त्याचबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

बार्शीच्या उद्योगविश्वाला चालना देण्यासाठी भागभांडवल उभारणी व आर्थिक तरतुदी करून सहकार्य करण्याची हमी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. बार्शीतील लघु उद्योजकांसमोर डाळ मिल कारखानदार, चिंच व चिंचुका प्रक्रिया, पी.व्ही.सी. पाइप कारखाना इत्यादी उद्योग सद्यस्थितीतील असलेल्या अडचणी, भागभांडवलाची गरज, मोठमोठ्या बँकांची मदत मिळावी, याकरिता केंद्रीय अर्थ खात्यामार्फत लघु उद्योजकांसाठी विशेष आर्थिक तरतुदी करून, भागभांडवल उभारणीसाठी बँकांमार्फत सहकार्य करण्याची मागणी आमदार राजेंद्र राऊत व शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्याकडे केली. यावेळी सोजर समूहाचे प्रमुख अरुण बारबोले, अतुल सोनिग्रा, मनोहर सोमाणी, अविनाश बागमार, संतोष बोगावत, धनंजय घोलप उपस्थित होते.

140821\17160902img-20210814-wa0009.jpg

आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शीच्या उद्योजकांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे व भागवत कराडांची भेट

Web Title: Entrepreneurs from Barshi met the Industry Minister regarding pending industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.