पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:19 PM2018-06-05T12:19:36+5:302018-06-05T12:19:36+5:30

आनंदश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनजागरण, ४५ वर्षांपासून झटणारे रायते दाम्पत्य

Environmental special: Married couples who have been creating environmental awareness for 45 years | पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

पर्यावरणदिन विशेष : ४५ वर्षापासून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे रायते दांपत्य

Next
ठळक मुद्देपर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजेजगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताचीपर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही

महेश कुलकर्णी 
सोलापूर : पर्यावरणावर जेवढे काम होईल तेवढा मानवाला दिलासा मिळणार आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या पटीत होणारी हानी यामुळे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजे. पर्यावरणावर काम म्हणजे स्काय इज लिमिट असल्याचे प्रतिपादन गेल्या ४५ वर्षांपासून जनजागृती करणारे डॉ. वासुदेव आणि डॉ. माधवी रायते या दाम्पत्याने  केले.

भारताची लोकसंख्या १२५ कोटींवर गेली आहे. ती वाढतच चालली आहे. त्या तुलनेत पर्यावरणावर जनजागृती होताना दिसत नाही. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी एक रोप लावून ते जगवले तरी वर्षाला १२५ कोटी झाडे वाढतील. असा संकल्प कोणी करताना दिसत नाही. पर्यावरणावर जेवढे काम करता तेवढे केले पाहिजे. विशेषत: लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणारे कार्यक्रम सरकारच्या वतीने होताना दिसत नाहीत. जगातील सर्वात मोठी दुसरी लोकसंख्या भारताची आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हम दो हमारा एक’ हा कार्यक्रम आता राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

डॉ़ वासुदेव आणि डॉ़ माधवी रायते हे जोडपे १९६९ पासून पर्यावरणविषयक जनजागृती करीत आहे़ भाऊ, बहीण, मुले अशा नऊ जणांच्या कुटुंबाने पर्यावरण जपण्याचा वसा घेतला आहे़ ३० वर्षांपूर्वी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात काम करीत असताना डॉ़ वासुदेव रायते यांनी तिथल्या ओसाड माळरानावर साडेदहा हजार झाडे लावून परिसर हिरवागार केला़ यानंतरच्या काळात राज्यभर शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, युवा वर्ग, संस्था आदी ठिकाणी फिरून निसर्ग ºहासाबाबत जनजागृती केली़ अनेक संस्था, महाविद्यालयांमध्ये वृक्ष लावले़ 

 वडिलांच्या शताब्दीनिमित्त या जोडप्याने ‘आनंदश्री’ प्रतिष्ठान स्थापन करून पर्यावरण जपण्याची चळवळ उभी केली़ सोलापुरात हरिभाई देवकरण, मेडिकल कॉलेज, शाळा, महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी झाडे लावून पर्यावरणविषयक जनजागृती केली़ ३ जानेवारी १९९६ साली कंबर तलावाजवळील ५० एकर माळरानावर लोक, लोकनेते आणि लोकशासनाच्या मदतीने स्मृती उद्यान उभे केले़ साडेतीन हजार झाडे आणि १५ उपवने तयार झाली आहेत़ याशिवाय यांच्या प्रयत्नांतून लहान मुलांसाठी तारांगण पार्क, इको लायब्ररी, निसर्ग परिचय केंद्र उभारले आहे़

अवघ्या महाराष्टÑाला हे उद्यान भूषणावह उपक्रम ठरले आहे़ याबरोबरच अलीकडे त्यांनी ४५ वर्षांतील आपल्या सामाजिक उपक्रमांचा अहवाल तयार करून तो इन्कम टॅक्स विभागाला सादर केला़ या विभागाने एसटीजी अंतर्गत देणगीदारांसाठी ‘तहहयात’ करसवलतीचा अधिकार दिला़ जमा झालेल्या रकमेच्या व्याजावर या उद्यानाचे संगोपन हे जोडपे करीत आहे़ 
त्यांच्या या कार्याची दखल अलीकडे समाजाने आणि शासनाने घेतली़ डॉ़ वासुदेव रायते यांना ‘वसुंधरा’ पुरस्कार तर डॉ़ माधवी रायते यांना ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे़

आज वृक्ष लागवड
- रायते दाम्पत्य वर्षभर पर्यावरणाची जनजागृती करीत असते. मंगळवारी पर्यावरण दिनानिमित्त आनंदश्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना ते जोपासण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Environmental special: Married couples who have been creating environmental awareness for 45 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.