कोरोनाचा उद्रेक; पाच दिवसांत तब्बल ५४० बधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:22+5:302021-03-28T04:21:22+5:30

तीन दिवसांत शहरात २०१ तर ग्रामीण भागात १४२ असे ३४३ रुग्ण आढळून आले. दुसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूची वाढ काही ...

Eruption of corona; Over 540 victims in five days | कोरोनाचा उद्रेक; पाच दिवसांत तब्बल ५४० बधितांची भर

कोरोनाचा उद्रेक; पाच दिवसांत तब्बल ५४० बधितांची भर

Next

तीन दिवसांत शहरात २०१ तर ग्रामीण भागात १४२ असे ३४३ रुग्ण आढळून आले.

दुसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूची वाढ काही केल्या थांबण्यास तयार नाही. गेल्या आठवड्यात तब्बल साडेतीनशे रुग्ण सापडल्यानंतर या आठवड्यात तर कोरोनाने वाढीचा कहर झाला आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल १०२ रुग्ण आढळून आले. मंगळवारी देखील ९५ रुग्ण आढळले. एकंदरीतच या आठवड्यातील ५ दिवसांत मिळून ५४० रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. गायकवाड यांनी दिली.

त्यानंतर बुधवारी १३०, गुरुवारी ११०, शुक्रवारी १०५ रुग्ण आढळले. या तीन दिवसांत शहरात २०१ आणि ग्रामीण भागातील १४२ रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी शहरात ६७८ आणि ग्रामीण भागात ६८० ॲन्टिजन तर ५१४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. मंगळवारी शहरात १०५६ आणि ग्रामीण भागात ५०१ अशा १५५७ ॲन्टिजन चाचण्या केल्या. बुधवारी १२५४, गुरुवारी १८२५ तर शुक्रवारी २०१० अशा एकूण ५०८९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

या भागात वाढताहेत रुग्ण

शहरात अलीपूर रोड, सुभाषनगर, उपळाई रोड, नाईकवाडी प्लॉट, भीमनगर, मंगळवार पेठ, अलीपूर रोड, पाटील प्लॉट आदी भागत जास्त रुग्ण सापडले आहेत, तर वैराग, खांडवी, भालगाव गौडगाव, मालवंडीमध्ये जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Eruption of corona; Over 540 victims in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.