कचाट्यातून सुटली; पण फुलाबाई वाचली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:47+5:302020-12-08T04:19:47+5:30
----भक्ष्य म्हणून शेळी, बोकड पिंजऱ्यात करमाळा तालुक्यात लिंबेवाडी, अंजनडोह, उम्रड, मोरवड, मांजरगाव, रोसेवाडी, कोर्टी व आता चिखलठाण या ठिकाणी ...
----भक्ष्य म्हणून शेळी, बोकड पिंजऱ्यात
करमाळा तालुक्यात लिंबेवाडी, अंजनडोह, उम्रड, मोरवड, मांजरगाव, रोसेवाडी, कोर्टी व आता चिखलठाण या ठिकाणी वनखात्याने १५ पिंजरे ग्रामस्थांची मदत घेऊन बसवले असून, त्या पिंजऱ्यात सावज म्हणून बोकड, शेळी स्थानिक गावकऱ्यांककडून वनखात्याने पाच ते सात हजार रुपये किमतीला विकत घेऊन ठेवले आहेत. त्या प्रत्येक पिंजऱ्याजवळ एक वनरक्षक तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून एकाही पिंजऱ्यात बिबट्या अडकला नाही.
चौकट घेणे..
शार्पशूटरचा नेम हुकला अन् बिबट्या पळाला..
चिखलठाण येथे लांडाहिरा भागात ऊसतोड मजुराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. त्या ठिकाणी राजेंद्र बारकुंड यांचे पंधरा एकरात उसाचे फड व केळीच्या बागा आहेत. त्यामध्ये बिबट्या लपल्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या साठ ते सत्तर जणांच्या फौजफाट्यासह ग्रामस्थांच्या सहकार्याने कडेने वाघर लावले व तुटून गेलेल्या उसाच्या पाचटाला आग लावली तेव्हा एकदा नव्हे, दोनदा बिबट्या दिसल्यानंतर शार्पशूटरने बिबट्याच्या दिशेने गोळी मारली. पण, नेम हुकला. पुन्हा बिबट्या ना दिसला, ना फडाच्या बाहेर आला. तो शेटफळच्या दिशेने पळाल्याचे सांगण्यात आले. अंधार पडल्यानंतर वनविभागाचे पथक शेटफळकडे पुढील तपासासाठी रवाना झाले.