कोरोनाबाधितांच्या सुलभ उपचारासाठी नोडल अधिकारी कक्षाची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:13+5:302021-05-15T04:20:13+5:30
या वेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती किशोर सूळ, तांत्रिक तालुका नोडल अधिकारी डॉ. खडतरे, अजय राऊत ...
या वेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती किशोर सूळ, तांत्रिक तालुका नोडल अधिकारी डॉ. खडतरे, अजय राऊत आदी उपस्थित होते.
पंचायत समितीने ग्रामपंचायतींच्या मदतीने नावीन्यपूर्ण कोरोना प्रतिबंधात्मक व आरोग्य सुविधा सुलभीकरण उपाययोजना उपक्रम हाती घेतला आहे. वाढता प्रादुर्भाव, नागरिकांमधील भीतीचे वातावरण, वैद्यकीय सुविधांची कमतरता व वाढता मृत्युदर लक्षात घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम कोविड वाॅर रूमची स्थापना केली आहे.
---
...असे चालणार ग्राम वॉर रूम
गृह विलगीकरणातील व संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांना जागेवरच औषधोपचार पुरविणे, संक्रमित रुग्णांना धीर देणे, समुपदेशन करणे. ताणतणावमुक्त राहण्यासाठी प्रोत्साहित करणे, आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रचनात्मक प्रयोजन करणे, मर्यादित आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करणे, कोविड वॉर रूममध्ये समन्वयक म्हणून शिक्षक काम पाहतील. त्यांना साहाय्यक म्हणून आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम स्वयंसेवक मदत करतील. गावातील रुग्ण, संभाव्य रुग्ण यांची दैनंदिन माहिती ही पंचायत समितीमधील नोडल अधिकारी कक्षास देतील.
---
ग्राम वॉर रूम माध्यमातून रुग्णांना आवश्यक औषधोपचार, मार्गदर्शन व मदत मिळेल. रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यामुळे संभाव्य धोका टाळता येईल.
- स्मिता पाटील
गटविकास अधिकारी