सांगोला येथे वृक्ष बँकेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:08+5:302021-01-09T04:18:08+5:30
नगराध्यक्षा राणी माने, नूतन आरोग्य सभापती रफिक तांबोळी, पाणीपुरवठा सभापती शोभा घोंगडे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, ...
नगराध्यक्षा राणी माने, नूतन आरोग्य सभापती रफिक तांबोळी, पाणीपुरवठा सभापती शोभा घोंगडे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या आवारात गुरुवारी (दि. ७) हा कार्यक्रम पार पडला.
शहरातील नागरिक, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब, सामाजिक संस्था, उत्सव मंडळे, राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांनी पर्यावरणपूरक देशी वृक्षांची रोपे व संरक्षण जाळ्या देऊन या वृक्ष बँकेस सहकार्य करायचे आहे. वृक्ष बँकेस रोपे भेट देणाऱ्या सर्व संस्था, नागरिक यांचे रेकॉर्ड जतन केले जाईल. शक्य झाल्यास रोपांच्या संरक्षणासाठी लावण्यात येणाऱ्या जाळीवर त्यांची नावे लावण्यात येतील.
कोरोनाने अनेक गोष्टी शिकविल्या
कोरोनाने अनेक गोष्टी शिकविल्या. पूर्वी चित्रकला स्पर्धेत मुले दोन डोंगरांच्या मध्यभागी उगवणाऱ्या सूर्याचे चित्र काढत असत. परंतु आजची मुले दोन इमारतींमधून उगवणाऱ्या सूर्याचे चित्र काढतात. ही परिस्थिती धोकादायक आहे. स्वच्छ हवा, नद्या, डोंगर, निसर्ग, पर्यावरण यांची जपवणूक करण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. यात आपला खारीचा वाटा उचलण्याच्या हेतूने नगरपरिषदेमार्फत या वृक्ष बँकेची सुरुवात केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
कोट ::::::::::::::::::::
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थापन केलेल्या वृक्ष बँकेमार्फत संपूर्ण शहरात वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची एक नवी दिशा मिळेल. या वृक्ष बँकेची स्थापना शहरातील भावी पिढ्यांसाठी नगरपरिषदेची एक अमूल्य भेट ठरेल.
- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला