पावसाळा अखेरला आला तरी ४१ लघु तलाव कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:07+5:302021-09-05T04:27:07+5:30
सोलापूर जिल्ह्यात ८ मध्यम व ५६ लघु तलाव आहेत. मध्यम प्रकल्पापैकी सोलापूर शहरालगतचा एकरुख (हिप्परगा) तलावात १.०२ टीएमसी इतके ...
सोलापूर जिल्ह्यात ८ मध्यम व ५६ लघु तलाव आहेत. मध्यम प्रकल्पापैकी सोलापूर शहरालगतचा एकरुख (हिप्परगा) तलावात १.०२ टीएमसी इतके ४७.१२ टक्के पाणी आहे. हिंगणी तलावात ०.२८ टीएमसी म्हणजे २४.५७ टक्के पाणी आहे. जवळगाव तलावात ०.३१ टीएमसी म्हणजे ३०.२० टक्के, मांगी तलावात ०.२३ टीएमसी म्हणजे २१.७९ टक्के, आष्टीत ०.२५ टीएमसी ३०.८६ टक्के, पिंपळगाव ०.०१ टीएमसी म्हणजे वजा ३.५५ टक्के तर बोरी तलाव संपूर्ण भरला आहे.
हणमगाव, पोखरापूर, सोरेगाव, गळोरगी, शिरवळवाडी, चिक्केहळळी, हंजगी, डोंबरजवळगे, भुरीकवठे, काझीकणबस, बोरगाव, पारेवाडी, वडशिवणे, हिंगणी क., म्हसेवाडी, वीट, कोंडेज, राजुरी, कुंभेज, नेर्ले, सांगवी, सापटणे, परिते, निमगाव, अचकदाणी, चिंचोली, घेरडी, जवळा, हंगीरगे, जुनी व भोसे हे तलाव कोरडे असल्याने पाटबंधारे खात्याच्या अहवालात म्हटले आहे. पावसाळ्याचा एक महिना व परतीच्या पावसावर तलावाचे भवितव्य अवलंबून आहे.
----
५६ पैकी कळंबवाडी एकमेव लघु तलाव भरला
५६ लघु तलावापैकी कळंबवाडी हा एकमेव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. होटगी ५२ टक्के व रामपूर १६ टक्के, बीबीदारफळ ४ टक्के तसेच पाथरी, कोरेगाव, गोरमाळे, कारी, वालवड, काटेगाव, तावडी, ममदापूर, शेळगाव, वैराग, चारे या १५ तलावांत १०.५२ टक्के पाणी साठा आहे. आठ मध्यम तलावाची २३०.९४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी २०४.६४ दलघमी उपयुक्त पाणी, आज एकूण ९९.१० दलघमी इतके ३.५० टीएमसी पाणी आहे. यामध्ये ७२.८० दलघमी म्हणजे २.५७ टीएमसी, ३५.५८ टक्के पाणी उपयुक्त आहे.
0 ५६ लघु तलावात १६.०९ दलघमी पाणी म्हणजे १०.५२ टक्के साठा आहे.
----