स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही रस्ते जाताहेत काट्याकुट्यांतूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:27 AM2021-08-18T04:27:55+5:302021-08-18T04:27:55+5:30

अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर हा रस्ता जरी हायटेक होत असला तरी अक्कलकोटच्या उत्तर भागातील चपळगांव, हन्नुर, कुरनूर, डोंबरजवळगे, तिर्थ, हालहळ्ळी(अ), चुंगी, ...

Even after five hundred years of independence, the roads are still paved with thorns! | स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही रस्ते जाताहेत काट्याकुट्यांतूनच!

स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही रस्ते जाताहेत काट्याकुट्यांतूनच!

Next

अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर हा रस्ता जरी हायटेक होत असला तरी अक्कलकोटच्या उत्तर भागातील चपळगांव, हन्नुर, कुरनूर, डोंबरजवळगे, तिर्थ, हालहळ्ळी(अ), चुंगी, किणी, बऱ्हाणपूर, नन्हेगाव, दर्शनाळ, मोट्याळ यांसह अनेक गावांना जोडणारे रस्ते पार खराब झाले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महामार्ग गुळगुळीत होत आहेत. तर अंतर्गत गावांना जोडणारे रस्ते कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

........

तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. अनेक अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची दुरूस्ती संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे. चपळगाववाडी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे.

-उमेश पाटील , माजी सरपंच, चपळगाव

...........

दुरवस्था झालेले रस्ते..

डोंबरजवळगे-बोरेगांव,

चपळगाव-हालहळ्ळी-कर्जाळ,

तिर्थ-चपळगाव,

बावकरवाडी-कुरनूर,

दहिटणे-सिंदखेड,

बऱ्हाणपूर-डोंबरजवळगे,

तिर्थ-डोंबरजवळगे,

हन्नुर-डोंबरजवळगे,

हन्नुर-चुंगी,

बऱ्हाणपूर-वडगांव-दिंडूर,

किणी-काझीकणबस

.......

फोटो १७चपळगाव

170821\img-20210812-wa0002.jpg

अक्कलकोटच्या उत्तर भागातील डोंबरजवळगे-बोरेगाव रस्त्याची झालेली दुरावस्था..

Web Title: Even after five hundred years of independence, the roads are still paved with thorns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.