चार दिवसानंतरही टँकर ५० फूट खोल विहिरीत पडूनच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:24 AM2021-09-23T04:24:50+5:302021-09-23T04:24:50+5:30
अक्कलकोट : रस्त्यावरून निघालेला सिमेंट टँकर कर्जाळ येथील येथील एका शेतक-याच्या विहिरीत रविवारी भल्या पहाटे कोसळला. त्यानंतर चार ...
अक्कलकोट : रस्त्यावरून निघालेला सिमेंट टँकर कर्जाळ येथील येथील एका शेतक-याच्या विहिरीत रविवारी भल्या पहाटे कोसळला. त्यानंतर चार दिवसानंतरही विहीरीत टँकर अद्यापही बाहेर काढण्यात यश आले नाही.
कर्जाळ येथे शेतकरी चंद्रकांत स्वामी यांची कर्जाळ येथे रस्त्यालगत शेतजमीन आहे. तसेच या शेतात अर्थात रस्त्यापासून काही अंतरावर विहीर आहे. ठिकाणी उतारा व भुसभुशीत जमीन आहे. तसेच एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. समोरून येणा-या वाहानाच्या लाईटच्या उजेडात चालकाला अंधारात रस्त्याचा अंदाज आला नाही. परिणामी टँकर विहिरीत जाऊन पडला. नशिब बलवत्तर म्हणून टँकर चालक अंधारात केबिनमधून बाहेर आला.
वाहन कोसळलेली विहीर ही ५० फूट खोल आहे. त्यात २५ फूट पाणी आहे. सोलापूरहून कर्नाटकमध्ये कलबुर्गी जिल्ह्यातील मलखेड, शेडम, शाबाद या ठिकाणी सिमेंट भरण्यासाठी हे वाहन (एम. एच. ४५/ ए. एफ. ८८५५) निघाले होते. चालक एका ठराविक ठिकाणी जाऊन थांबताच केबीन फोडून बाहेर पडला. हा टँकर चार दिवसांपासून विहिरीत पडून आहे. विहीरीतून टँकर काढण्यात अद्यापही यश आले नाही.
---
फोटो:२१ कर्जाळ
कर्जाळ येथे एका विहिरीत सिमेंट टँकर जाऊन असा कोसळला.