ग्रामपंचायतीने टोकन देऊनही लसीविनाच परतावे लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:59+5:302021-05-29T04:17:59+5:30
मागील एक ते दीड महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. ...
मागील एक ते दीड महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी नागरिक धजावत नव्हते. परंतु लस सुरक्षित असल्याबाबत शासनस्तरावरून जनजागृती केल्याने नागरिकांचा कल बदलला आणि लसीकरणास प्राधान्य देऊ लागले. अशातच लसीचा तुटवडा होऊ लागल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली. त्यामुळे विनागर्दी, गोंधळ न होता लसीकरणासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर देण्यात आली.
असे असताना २५ मे रोजी नेमतवाडी येथील ६२ वर्षीय वृद्ध हनुमंत पाखरे यांना टोकन देण्यात आले. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात तस शिल्लक नसल्याचे कारण सांगून त्यांना माघारी पाठविण्यात आले. यामुळे नागरिकांमधून आरोग्य विभागाच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
कोट ::::::::::::::
नेमतवाडी गावासाठी चार लस आल्या होत्या. त्यामधील एक लस फ्रंटलाइन वर्कर म्हणून शिक्षकाला दिली. लस आल्यानंतर नेमतवाडीसाठी एक वाढवून देऊ.
डॉ. प्रभावती साखरे
प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबरे-पागे
कोट ::::::::::
उंबरे येथे लस घेण्यासाठी ३६ किमीचा प्रवास करावा लागत आहे. माझे वय ६२ वर्षे असताना मला हेलपाटे मारण्याची वेळ येत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे.
- हनुमंत पाखरे
वंचित लाभार्थी, नेमतवाडी